नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा रद्द करण्यसाठी काँग्रेसकडून देशभरामध्ये जेईई-नीट परीक्षांविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू आहे. यातच आज सर्वोच्च न्यायालयामध्ये 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. 17 ऑगस्टला दिलेल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्यात यावा आणि परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी याचिकेत केली आहे.
-
Ministers from 6 States- West Bengal, Jharkhand, Rajasthan, Chhattisgarh, Punjab & Maharashtra file review petition in the Supreme Court seeking review of August 17 order of the Court and postponement of #JEE_NEET scheduled to be held in September. pic.twitter.com/G3GXYufrkY
— ANI (@ANI) August 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ministers from 6 States- West Bengal, Jharkhand, Rajasthan, Chhattisgarh, Punjab & Maharashtra file review petition in the Supreme Court seeking review of August 17 order of the Court and postponement of #JEE_NEET scheduled to be held in September. pic.twitter.com/G3GXYufrkY
— ANI (@ANI) August 28, 2020Ministers from 6 States- West Bengal, Jharkhand, Rajasthan, Chhattisgarh, Punjab & Maharashtra file review petition in the Supreme Court seeking review of August 17 order of the Court and postponement of #JEE_NEET scheduled to be held in September. pic.twitter.com/G3GXYufrkY
— ANI (@ANI) August 28, 2020
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या पार्श्वभूमीवर काँग्रेसशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यातील चर्चेनंतर या राज्यांनी हे पाऊल उचलले आहे. पुर्नविचार याचिका दाखल केलेल्या 6 राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. कोरोना संकटकाळात परीक्षा घेण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. तसेच कोरोनामुळे सध्या देशातील पायाभूत सुविधा परीक्षा घेण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत, असे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल म्हणाले.
दरम्यान, जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर 2020 दरम्यान होणार असून, नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईईसाठी सुमारे 8.58 लाख विद्यार्थ्यांनी, तर नीटसाठी सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.