नवी दिल्ली - भारत-फ्रान्स मधील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन लेमोईन भारत दौऱ्यावर आहेत. लेमोईन म्हणाले, राफेल लष्करी विमानाला काही महिन्यांमध्ये भारतात पोहचवले जाणार आहे. भारतात १-१ करुन सर्व राफेल विमाने पोहचवली जाणार आहेत.
आज (सोमवार) लेमोईन यांनी भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत-फ्रान्सच्या राजकीय संबंध मजबूत करण्याबाबत चर्चा केली. यानंतर, त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशीही भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना लेमोईन म्हणाले, मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात जी-७ शिखर परिषदेत भेट होईल. या भेटीत दोन्ही देशांतील करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याची शक्यता आहे. दहशतवाद्याच्या मुद्यावर फ्रान्स नेहमी भारतासोबत उभा आहे. यावेळी दहशतवाद हा प्रत्येक देशासाठी धोकादायक आहे.
जीन लेमोईन यांनी दिल्लीत फ्रान्समध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फ्रान्समध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे. आतापर्यंत फ्रान्समधून जवळपास ८ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.