ETV Bharat / bharat

कोरोनाच्या लढाईमध्ये जपान आपल्या सोबत; देणार ३,५०० कोटींचे कर्ज - India

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, जपानने केलेली ही मदत अगदी मोलाची ठरणार आहे. या निधीमधून रुग्णालयांमध्ये आयसीयू युनिट वाढवण्यासाठी, तसेच दुर्गम भागापर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यासाठी मदत मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Japan to extend emergency loan of Rs 3,500 cr for India to fight Covid-19 pandemic
कोरोनाच्या लढाईमध्ये जपान आपल्या सोबत; देणार ३,५०० कोटींचे कर्ज
author img

By

Published : Sep 1, 2020, 8:22 AM IST

नवी दिल्ली : भारताला कोरोनाविरुद्ध लढाईसाठी मदत म्हणून, ५० बिलियन येन एवढे कर्ज जपान देणार आहे. देशातील आरोग्य सुविधांसाठी हे कर्ज वापरले जाणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागातील अतिरिक्त सचिव सी. एस. मोहापात्रा आणि जपानचे राजदूत सुझूकी सातोशी यांनी सोमवारी यासंदर्भातील कागदपत्रे एकमेकांना सुपूर्द केली.

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, जपानने केलेली ही मदत अगदी मोलाची ठरणार आहे. या निधीमधून रुग्णालयांमध्ये आयसीयू युनिट वाढवण्यासाठी, तसेच दुर्गम भागापर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यासाठी मदत मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • Exchanged the E/N for Grant Aid with Dr. C.S. Mohapatra, Additional Secretary, Department of Economic Affairs, Ministry of Finance. By providing Oxygen Generators, Japan remains committed in assisting India’s fight against COVID-19 and other infectious diseases. #FightCOVID pic.twitter.com/8LtSUpzBkU

    — Satoshi Suzuki (@EOJinIndia) August 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या कर्जाचा व्याजदर हा ०.०१ टक्के प्रतिवर्ष आहे. तसेच, चार वर्षांच्या सवलतीसह एकूण १५ वर्षांमध्ये याची परतफेड करायची आहे. वैद्यकीय मदतीसोबतच, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठीही यामधील १ बिलियन येन वापरण्यात येणार आहेत. याबाबतही दोन्ही देशांमध्ये बोलणी झाली आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचे ३६ लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले असून, ६४,४६९ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आजपर्यंत देशात ४ कोटी २३ लाख ७ हजार ९१४ कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

हेही वाचा : भारतातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.