हैदराबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ फ्रेब्रुवारीला सपत्निक भारत दौऱ्यावर येणार आहेत. एकीकडे ट्रम्प भारतामध्ये येण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे भारतामध्ये ट्रम्प यांच्या एका चाहत्याने त्यांचा पुतळाच उभा केला आहे. बुसा कृष्णा असे त्या चाहत्याचे नाव असून तो तेलंगाणा राज्यातील जनगाव येथील रहिवाशी आहे. बुसाने गेल्या वर्षी 6 फूट उंच असा हा पुतळा उभारला आहे.
-
Bussa Krishna: I want India-America relations to remain strong. Every Friday I fast for Trump's long life. I also carry his picture and pray to him before commencing any work. I wish to meet him, I request the government to make my dream come true. #Telangana https://t.co/uSfuyx3Acl pic.twitter.com/NPetvpANoU
— ANI (@ANI) February 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bussa Krishna: I want India-America relations to remain strong. Every Friday I fast for Trump's long life. I also carry his picture and pray to him before commencing any work. I wish to meet him, I request the government to make my dream come true. #Telangana https://t.co/uSfuyx3Acl pic.twitter.com/NPetvpANoU
— ANI (@ANI) February 18, 2020Bussa Krishna: I want India-America relations to remain strong. Every Friday I fast for Trump's long life. I also carry his picture and pray to him before commencing any work. I wish to meet him, I request the government to make my dream come true. #Telangana https://t.co/uSfuyx3Acl pic.twitter.com/NPetvpANoU
— ANI (@ANI) February 18, 2020
भारत -अमेरिकेदरम्यानचे संबंध मजबूत व्हावेत, अशी माझी इच्छा आहे. मी आठवड्यातून प्रत्येक शुक्रवारी ट्रम्प यांच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास पकडतो. कोणतेही काम करण्यापूर्वी मी त्यांच्या फोटोला प्रार्थना करतो. मला त्यांची भेट घ्यायची आहे, असे बुसा म्हणाले. तसेच त्यांनी ट्रम्प यांच्यासोबत आपल्याला भेटू द्यावे, अशी विनंती सरकारला केली आहे. कृष्णा बुसा हे ट्रम्प यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून त्याची पुजाही करतात.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ट्रम्प भारतभेटीवर येत असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलेनिया देखील येणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथग्रहण केल्यानंतर तीन वर्षांनी, अखेरीस डोनाल्ड ट्रम्प आता भारताला भेट देणार आहेत. ट्रम्प यांची भारतभेट जगाच्या नजरेत भरण्याच्या दृष्टीने आणि राजकीय रेट्यासाठी महत्वाची ठरणार आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील.