श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात लेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन जण ठार झाले. अनंतनाग जिल्ह्यातील हाकुरा गावात हा हल्ला झाला. याविषयी अधिक माहिती आणि हल्ल्याच्या कारणांची चौकशी सुरू आहे.
आजच जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती मिळाली होती. या हल्ल्यामुळे काश्मीर विद्यापीठाबाहेर झालेल्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याचे समजले आहे.
श्रीनगरच्या हजरतबल परिसरातील काश्मीर विद्यापीठाजवळ मंगळवारी संशयितांनी एक ग्रेनेड बॉम्ब फेकला. दुपारी २ वाजता हा बॉम्ब फेकण्यात आला. विद्यापीठाच्या सर सैयद दरवाज्याजवळ हा बॉम्ब फेकला होता. यात २ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
याआधी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत मंगळवारी आणखी एक दहशतवादी मारला गेला. यानंतर काही वेळातच या चकमकीत आणखी दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.