पुलवामा - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून एका महिलेची हत्या केली आहे. तसेच एक युवकही या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. आज पहाटे ही घटना घडली.
देशात एकीकडे ईद उत्साहात साजरी केली जात असताना जम्मू काश्मीर मात्र धुमसत आहे. आज पाहटे पुलवामा जिल्ह्यातील नारबल गावातील काकपुरा भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी एका महिलेला गोळ्या घालून तिची हत्या करण्यात आली. या गोळीबारात एक युवकही गंभीर जखमी झाला आहे.