ETV Bharat / bharat

आसामनंतर आता दिल्लीतही 'कॅब' विरोधी आंदोलन पेटले; जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन - जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठ आंदोलन

राजधानी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करत आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

jamia
जामिया विद्यापीठातील विद्यार्थांचे आंदोलन
author img

By

Published : Dec 13, 2019, 7:55 PM IST

Updated : Dec 14, 2019, 1:51 AM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करत आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

जामिया विद्यापीठातील विद्यार्थांचे आंदोलन

हेही वाचा - नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक सर्व राज्यांना लागू करावेच लागणार; 'ही' आहे घटनात्मक तरतूद

विद्यापीठापासून संसदेपर्यंत मोर्चा नेण्याची हाक विद्यार्थ्यांनी दिली होती. मात्र, पोलिसांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसरामध्ये अडवले. पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अनेक आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक रद्द करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

हेही वाचा - 'कॅब' : आसाम, दिल्ली अन् पश्चिम बंगालमधील आंदोलन तीव्र; ईशान्य सीमेवरील १०६ रेल्वेगाड्या रद्द

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत पास झाले आहे. मात्र, या विधेयकाला विरोध करत दोन दिवसांपासून संपूर्ण ईशान्य भारत रस्त्यावर उतरला आहे. आसाममध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाचे लोण आता पश्चिम बंगालमध्येही पोहोचले असून, बेलदंगा रेल्वे स्थानकाला आंदोलकांनी पेटवल्याची माहिती मिळत आहे. केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी विधेयकाला विरोध दर्शवला आहे.

Intro:Body:

आसामनंतर आता दिल्लीतही कॅब विरोधी आंदोलन पेटले; जामिया विद्यापीठातील विद्यार्थांचे आंदोलन

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी  नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करत आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

विद्यापीठापासून संसदेपर्यंत मोर्चा नेण्याची हाक विद्यार्थ्यांनी दिली होती. मात्र, पोलिसांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसरामध्ये अडवले. पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अनेक आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक रद्द करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.       

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत पास झाले आहे. मात्र, या विधेयकाला विरोध करत दोन दिवसांपासून संपूर्ण ईशान्य भारत रस्त्यावर उतरला आहे. आसाममध्ये सुरु झालेल्या या आंदोलनाचे लोण आता पश्चिम बंगालमध्येही पोहोचले असून, बेलदंगा रेल्वे स्थानकाला आंदोलकांनी पेटवल्याची माहिती मिळत आहे. केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी विधेयकाला विरोध दर्शवला आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 14, 2019, 1:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.