नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबाहेरील रस्त्यांवर चित्रे रंगवून आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी एनआरसीलाही विरोध केला आहे.
CAA protest - जामिया विद्यापीठाबाहेर विद्यार्थ्यांचे रस्त्यांवर चित्रे काढून आंदोलन - जामिया विद्यापीठ आंदोलन
विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबाहेरील रस्त्यांवर चित्रे रंगवून आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी एनआरसीलाही विरोध केला आहे.
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबाहेरील रस्त्यांवर चित्रे रंगवून आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी एनआरसीलाही विरोध केला आहे.
CAA protest - जामिया विद्यापीठाबाहेर विद्यार्थ्यांचे रस्त्यांवर चित्रे काढून आंदोलन
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबाहेरील रस्त्यांवर चित्रे रंगवून आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी एनआरसीलाही विरोध केला आहे.
तुम्ही आमच्या बोलण्यावर, स्वातंत्र्यावर, सत्यावर संचारबंदी लादू शकत नाही, अशा घोषणा विद्यार्थ्यांनी रस्त्यावर लिहल्या आहेत.
मागील महिन्यात सीएए कायदा मंजूर झाल्यानंतर देशभरामध्ये या कायद्याविरोधात आंदोलन झाले. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. जामिया मिलिया विद्यापीठातही हिंसक आंदोलन झाले. उत्तरप्रदेशात उसळलेल्या हिसंक आंदोलनात १५ पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.
सीएए कायद्यामुळे पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानातील हिंदु, शीख, पारसी, बौद्ध, ख्रिश्चन, जैन धर्माच्या नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणे सोपे झाले आहे. हा कायद्यामध्ये ठराविक धर्मांचाच समावेश केल्यामुळे विरोधी पक्षांनी देशभर आंदोलन केले. भारताच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला या कायद्यामुळे तडा जात असल्याचे मत विरोधी नेत्यांनी आणि बुद्धीवाद्यांनी व्यक्त केले आहे.