बिजनौर- उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये तबलिगी जमातीच्या विदेशी लोकांनी सफाई कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्यांना वर्तनात सुधारणा केली नाही तर कठोर कारवाई करू अशी तंबी दिली आहे.
जनपद येथील नगीना भागात तबलिगी जमातचे इंडोनेशियातील 8 धर्मप्रसारक सापडले होते. त्यांना आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने क्वारंटाईन करण्यात आले होते.तबलिगी जमातीचे लोक रुग्णालयात वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करत असल्याची बाब समोर आली.
जमातीच्या लोकानी बिर्याणी मागितल्याची बातमी पसरली होती. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सक ज्ञान चंद यांनी याचा इन्कार केला आहे. तबलिगी जमातीच्या लोकांनी वर्तनात सुधारणा केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ज्ञान चंद दिला आहे.
तबलिगी जमातीच्या विदेशी लोकांनी रुग्णालयातील महिला नर्सेससोबत गैरवर्तन केल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या.