दिल्ली - जामा मशीदीच्या शाही इमामाच्या सचिवांचे मंगळवारी रात्री सफदरजंग रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने दिल्लीत दहशत पसरली आहे. त्यामुळे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी जामा मशीद पुन्हा बंद करण्याचे संकेत दिले आहेत. बुखारी यांचे सचिव अमानुल्लाह खान यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
अमानुल्लाह खान हे गेल्या अनेक दिवसापासून जामा मशीदीचे जनसंपर्काचेही काम संभाळत होते. ते दिल्लीतील बाटला हाऊसमध्ये राहत होते. २ जूनला त्यांना ताप आल्याने सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला.
तर होणार जामा मशीद बंद . . . .
जामा मशीदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी नागरिकांनी घरीच नमाज करण्याचे आवाहन केले आहे. सामान्य नागरिकांसाठी जामा मशीद बंद करण्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत. जर सचिव अमानुल्लाह खान यांच्या निधनाचे कारण कोरोना निघाले, तर जामा मशीद पुन्हा बंद करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.