जयपूर - राजस्थानात २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील ४ दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
१३ मे २००८ ला जयपूरच्या सांगानोरी गेट आणि चांदपोल परिसरातील हनुमान मंदिरांमध्ये, तसेच अन्य काही ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या साखळी बॉम्बस्फोट हल्ल्यात ७१ लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले होते, तर १८५ लोक यात जखमी झाले होते.
-
2008 Jaipur bomb blasts case: Jaipur court announces quantum of sentence in the matter, all the four convicts - Sarvar Aazmi, Mohammad Saif, Saifur Rahman, and Salman, to be hanged till death. pic.twitter.com/zsqcOeSGiC
— ANI (@ANI) December 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">2008 Jaipur bomb blasts case: Jaipur court announces quantum of sentence in the matter, all the four convicts - Sarvar Aazmi, Mohammad Saif, Saifur Rahman, and Salman, to be hanged till death. pic.twitter.com/zsqcOeSGiC
— ANI (@ANI) December 20, 20192008 Jaipur bomb blasts case: Jaipur court announces quantum of sentence in the matter, all the four convicts - Sarvar Aazmi, Mohammad Saif, Saifur Rahman, and Salman, to be hanged till death. pic.twitter.com/zsqcOeSGiC
— ANI (@ANI) December 20, 2019
या हल्ल्यातील आरोपींपैकी सरवर आजमी, मोहम्मद सैफ, सैफुर्रहमान आणि सलमान यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यातील पाचवा आरोपी शाहबाज याची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या हल्ल्यातील आणखी दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे. तसेच, शादाब, मोहम्मद खालीद आणि साजिद हे तिघे सध्या फरार आहेत.