ETV Bharat / bharat

जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : चार आरोपी दोषी, एकाची निर्दोष मुक्तता - jaipur bomb blasts

१३ मे २००८ला जयपूरच्या सांगानोरी गेट आणि चांदपोल परिसरातील हनुमान मंदिरांमध्ये, तसेच अन्य काही ठिकाणी साखळी बॉम्ब स्फोट झाले होते. या हल्ल्यातील आरोपींपैकी सरवर आजमी, मोहम्मद सैफ, सैफुर्रहमान आणि सलमान यांना दोषी ठरवण्यता आले. तर, शाहबाज याची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Jaipur bomb blasts case Four accused convicted one other accused acquitted
जयपूर बॉम्बस्फोटातील चार आरोपी दोषी, एकाची निर्दोष मुक्तता
author img

By

Published : Dec 18, 2019, 12:29 PM IST

जयपूर - २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील पाच आरोपींपैकी चार जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. तर, एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

  • 2008 Jaipur bomb blasts case: Four accused convicted under different sections, including Unlawful Activities (Prevention) Act; one other accused acquitted. pic.twitter.com/pf2rovo4qY

    — ANI (@ANI) 18 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

१३ मे २००८ला जयपूरच्या सांगानोरी गेट आणि चांदपोल परिसरातील हनुमान मंदिरांमध्ये, तसेच अन्य काही ठिकाणी साखळी बॉम्ब स्फोट झाले होते. या साखळी बॉम्बस्फोट हल्ल्यात ७१ लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले होते, तर १८५ लोक यात जखमी झाले होते.

या हल्ल्यातील आरोपींपैकी सरवर आजमी, मोहम्मद सैफ, सैफुर्रहमान आणि सलमान यांना दोषी ठरवण्यता आले. तर, शाहबाज याची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या हल्ल्यातील आणखी दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे. तसेच, शादाब, मोहम्मद खालिद आणि साजिद हे तिघे सध्या फरार आहेत.

हेही वाचा : 'उन्नाव' प्रकरणातील आरोपींच्या रक्ताचे नमुने घेतले; चार्जशीटसाठी भक्कम पुराव्यांची तयारी

Intro:Body:

जयपूर बॉम्बस्फोटातील चार आरोपी दोषी, एकाची निर्दोष मुक्तता

जयपूर - २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील पाच आरोपींपैकी चार जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. तर, एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

१३ मे २००८ला जयपूरच्या सांगानोरी गेट आणि चांदपोल परिसरातील हनुमान मंदिरांमध्ये, तसेच अन्य काही ठिकाणी साखळी बॉम्ब स्फोट झाले होते. या साखळी बॉम्बस्फोट हल्ल्यात ७१ लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले होते, तर १८५ लोक यात जखमी झाले होते.

या हल्ल्यातील आरोपींपैकी सरवर आजमी, मोहम्मद सैफ, सैफुर्रहमान आणि सलमान यांना दोषी ठरवण्यता आले. तर, शाहबाज याची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.