जगदलपूर - देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग या महामारीचा प्रभाव कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यातच आपल्या जीवाची परवा न करता सफाई कर्मचारी देखील आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. लोकांनी घराच्या बाहेर पडू नये यासाठी सफाई कर्मचारी दारोदार फिरून कचरा जमा करत आहेत.
मास्क आणि ग्लब्सचे वितरण -
सफाई कर्मचाऱ्यांना मास्क, टोपी यांसारखे साहित्याचे वाटप केले आहे. तसेच त्यांसाठी अन्नाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतकेच नाहीतर वेळोवेळी त्यांची तपासणी देखील केली जात आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी महापालिका पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचे महापौरांनी सांगितले.
सफाई कर्मचाऱ्यांचा पगार वेळवर होईल आणि सुट्टी घेतली तरी पगारामध्ये कपात होणार नसल्याचे महापौरांनी सांगितले.