श्रीनगर - कोविड -१९ सोबत लढाई करणार्या वैद्यकीय उपकरणांची कमतरता असल्याचे वृत्त जम्मू-काश्मीरच्या आरोग्य विभागाने फेटाळले आहे. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीरमध्ये 223 व्हेंटिलेटर आहेत. त्यातील जम्मूमध्ये 91 आणि काश्मीरमध्ये 132 व्हेंटिलेटर काम करत आहेत.
तसेच ४०० अतिरिक्त व्हेंटिलेटरची मागणी करण्यात आली होती. ते सर्व व्हेंटिलेटर लवकरात लवकर दाखल होतील, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच राज्यात मास्क आणि सॅनिटायझरची कमतरता नसून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये एकूण १०६ कोरोनाबाधित रुग्ण असून यातील दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.