जम्मू - देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान जम्मू-काश्मीर सरकारनेदेखील लॉकडाऊन दोन दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय रविवारी घेतला आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव बी.व्ही.आर. सुब्रमण्यम यांनी यासंबंधीत आदेश जारी केला आहे. हा आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 24 अन्वये काढण्यात आला आहे. सुब्रमण्यम म्हणाले, “राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) देशभरात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभागणी करणे गरजेचे आहे. त्या विभागणीच्या आधारावर तेथील कोणती आस्थापने सुरू करण्याची परवानगी द्यायची, कोणती बंधने कायम ठेवायची आणि काय शिथीलता द्यायची हे ठरविण्यात यावे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही या सर्व बाबींचा विचार करत असल्याचे सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम २४ अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करत ३ मे रोजी लावण्यात आलेला तिसरा लॉकडाऊन १ मे पर्यंत राहील, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत १,१०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.