ETV Bharat / bharat

कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांवर छापे; कारवाई अजून सुरूच - madhya pradesh

प्रवीण कक्कर, माजी सल्लागार राजेंद्र मिगलानी यांच्यावरही छापे टाकले आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच कक्कर आणि मिगलानी यांनी राजीनामे दिले होते. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

मध्य प्रदेशात छापे
author img

By

Published : Apr 8, 2019, 9:50 AM IST

नवी दिल्ली/ इंदौर/ भोपाळ - प्राप्तिकर विभागाने रविवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित सुमारे ५० ठिकाणी छापे टाकले आहेत. इंदौर, भोपाळ, नवी दिल्लीमध्ये ही कारवाई झाली. कमलनाथ याचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी प्रवीण कक्कर यांचे सहकारी अश्विन शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. ही कारवाई आज (सोमवार) अजूनही सुरू आहे.

प्रवीण कक्कर, माजी सल्लागार राजेंद्र मिगलानी यांच्यावरही छापे टाकले आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच कक्कर आणि मिगलानी यांनी राजीनामे दिले होते. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. काँग्रेसने या छाप्यांवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या पद्धतीने हे छापे टाकण्यात आले, त्यावरून मोदी सरकार लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा काँग्रेसविरोधात कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे वापर करत आहे, हे स्पष्ट होते. यात साधारण ३०० अधिकारी सहभागी झाले.

या छाप्यांमुळे सध्या मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे. 'या छाप्यात कोट्यवधींची काळी मालमत्ता जप्त झाली आहे, यावरून जे चोर आहेत, तेच चौकीदाराविरुद्ध तक्रारी करत असल्याचे सिद्ध होत आहे,' असे ट्विट भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केले आहे.

Intro:Body:

कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांवर छापे; कारवाई अजून सुरूच

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.