बंगळुरू - द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) नेत्या एम. के. कनिमोळी यांच्या तमिळनाडू येथील राहत्या घरी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. मात्र विभागाला त्यांच्या घरी काहीच आढळले नाही. शेवटी आयटी विभागाने दोनच तासात तपास थांबवला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर विभागाने हे कारवाई होती. त्या थुतूकुडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान भाजप हा देशविरोधी पक्ष आहे, असे नुकतेच एका वाहिनीवर त्यांनी म्हटले होते.
प्राप्तिकर विभागाने कारवाई केल्यानंतर कनिमोळींचे समर्थकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. तसेच, विभागाच्या कारवाई विरोधात निदर्शनेही केले. डीएमके पक्षाने काँग्रेस, सीपीआय, सीपीएम आणि तेथील काही स्थानिक पक्षांशी आघाडी केली आहे. तमिळनाडू येथे दोन टप्प्यात २२ लोकसभा मतदार संघामध्ये निवडणुका होणार आहेत. कनिमोळी यांनी आजच एका वाहिनीवर भाजप विरोधात मोठे वक्तव्य केले होते. त्यांनतर त्यांच्या निवास स्थानावर छापा टाकण्यात आला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पंतप्रधान मोदी हे संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना भिती दाखवत आहेत. भाजपच्या राज्याध्यक्ष तमिलसाई सुंदराराजन यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैशे आहेत. मात्र, आयटी विभाग त्यांच्यावर कारवाई करत नाही. मोदी आता निवडणूक आयोगाचाही गैरवापर करत आहेत, असे आरोप कनिमोळी यांचे बंधू आणि पक्षाचे सर्वेसर्वा एम.के. स्टालीन यांनी केला आहे. तर कनिमोळी यांनी तपासात कोणताही खंड पडू दिला नाही. तसेच त्यांनी मतद केली, असे आयटी विभागाने स्पष्ट केले आहे.
कनमोळी यांच्या विरोधात भाजपच्या राज्याध्यक्ष तमिलसाई सुंदराराजन रिंगणात आहेत. मागच्या वर्षी वंदना समुहाविरोधात स्थानिकांनी मोठा विरोध केला होता. दरम्यान तेथे पोलिसांनी गोळीबार केला होता. ज्यामध्ये जवळपास १४ लोकांचा मृत्यू झाला होता.