नवी दिल्ली - निवडणूक काळात अवैध पैसा वापरण्यावर आळा घालण्यासाठी प्राप्तिकर विभाग सक्रिय झाला आहे. त्यासाठी प्राप्तिकर विभागाने विशेष पथकाची स्थापना केली आहे. तर, एक कंट्रोल रुमही त्यांनी तयार केली असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत २४ तास हे खूले राहणार आहे. सामान्य जनता पक्षांकडून होणाऱ्या पैशाच्या दुरुपयोगाची माहिती सरळ या विभागाला देऊ शकणार आहेत. त्यासाठी एक टोल फ्री नंबरही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सामान्यतः आता कोणतीही व्यक्ती सोबत ५० हजार रुपयांची नगद बाळगू शकणार नाही. असा व्यक्ती विभागाच्या हाती लागला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. पैसे बाळगण्यासंबंधात त्याची कसून चौकशीही केली जाणार आहे. संतोषजनक उत्तर न मिळाल्यास त्याचे पैसे जप्त करून विभागीय कारवाई करण्यात येईल. तर, पोलिसांना सूचित करून त्याला तुरुंगात डांबण्यात येणार आहे.
मतदारांमध्ये पैसे वाटप थांबवण्यासाठी प्राप्तीकर विभागाने इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरिंग सेल (ईएएमएस)ची स्थापना केली आहे. या सेलने देशभरातील बँकाना एक निर्देश दिला आहे. त्यानुसार एखाद्या बँकेच्या खात्यातून १० लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली किंवा टाकली तर आली तर त्या खाते धारकाची कसून चौकशी होणार आहे. या चौकशीत तो दोषी आढळल्यास त्यावर विशेष कारवाई केली जाणार आहे.
प्राप्तिकर विभागाने मागच्या वर्षी प्रमाणेच यावर्षीही निवडणूकीमध्ये पैशांचा दुरुपयोग थांबवण्यासाठी टोल फ्री नंबर जाहीर केले आहेत. त्यानूसार मुंबईसह महाराष्ट्रामध्ये १८००२२१५१० या नंबवर आपली तक्रार नोंदवता येणार आहे. देशामधील प्रत्येक राज्यांचे प्राप्तिकर कार्यलये केंद्रीय प्राप्तिकर विभागाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पैशांचा अवैध वापर निवडणुकांसाठी होत आहे, हे लक्षात येताच प्राप्तिकर विभाग छापा मारून त्यांच्यावर कारवाई करेल.