ETV Bharat / bharat

Chandrayaan-२: देश तुमच्या पाठीशी, मोदींनी शास्त्रज्ञांना दिलं बळ - पंतप्रधान मोदी चांद्रयान-२

चांद्रयानाचा संपर्क तुटल्यामुळे नाराज होऊ नका, 'होप फॉर द बेस्ट', असे म्हणत नरेंद्र मोदींनी शास्त्रज्ञांना बळ दिलं

मोदी
author img

By

Published : Sep 7, 2019, 12:31 AM IST

Updated : Sep 7, 2019, 12:07 PM IST

बंगळुरु - विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यामुळे चांद्रयान -२ खाली उतरण्यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. २.१ किमी अंतरावर असताना विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यामुळे शास्त्रज्ञ तांत्रिक डेटा जमा करण्यामध्ये व्यस्त असून, संपर्क पुन्हा सुरळीत करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर मोदींनी शास्त्रज्ञांना मानसिक बळ दिलं. 'जीवनात चढ-उतार येतच असतात, तुम्ही खूप अभिमानास्पद काम करत आहात', असे पंतप्रधानांनी सांगितले. देश तुमच्या पाठीशी असल्याचे मोदी म्हणाले. आज(शनिवारी) सकाळी ८ वाजता नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.

lander
विक्रम लँडर

संपूर्ण देश उत्सुकतेने चांद्रयान - २ यशस्वीरीत्या उतरण्याची वाट पाहत होता. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. शास्त्रज्ञ संपर्क तुटल्यानंतर तांत्रिक डेटा(माहिती) मिळवण्यात व्यस्त असल्याची माहिती इस्रो प्रमुख के.सिवान यांनी दिली. पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्यास विक्रम लँडर चंद्रावर उतरेल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याची घोषणा केली.

जीवनात चढउतार येतच असतात, इस्रो खूप अभिमानास्पद काम करत आहे. मानवतेसाठी तुमचे खूप मोठे योगदान आहे, असे म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांना बळ दिलं. यानंतर त्यांनी चांद्रयानाचे उड्डाण पाहण्यास आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

नक्की चांद्रयान उतरण्यात कोणती अडचण आली, हे इस्रोकडून स्पष्ट करण्यात आले नसून, तांत्रिक बाबींवर शास्त्रज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. नियंत्रण कक्षामधील वातावरण तणावाचे आहे.

सॉफ्ट लँडिंगच्या प्रक्रियेदरम्यान रफ ब्रेकिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले काही मिनीटांमध्ये फाईन ब्रेकिंग सुरू असतानाच विक्रम लँडरशी संपर्क तुटला. सर्व काही सुरळीत असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर इस्रो प्रमुख के. सिवान यांनी संपर्क तुटल्याची घोषणा केली.

इस्रोची नियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. २.१ किमीवर संपर्क तुटला असून, विक्रम लँडरचा अभ्यास सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

chandrayan
विक्रम लँडर चंद्रावर उतरण्यास सुरूवात

Chandrayaan-2 LIVE UPDATE -

  • जीवनात चढउतार येतच असतात, इस्रो खूप अभिमानास्पद काम करत आहे.'मानवतेसाठी तुमचे खूप मोठे योगदान आहे' असे म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांना बळ दिलं. तसेच त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला
  • चंद्रापासून २.१ किलोमीटरवर असेपर्यंत नियोजित मार्गाने विक्रम लँडर प्रवास करत होते. मात्र, त्यानंतर संपर्क तुटला आहे. विक्रम लँडरशी संपर्काची आम्हीही वाट पाहतोय. तांत्रिक डेटा जमा करण्याचे काम सुरू आहे - इस्रो
  • २.१४ - तांत्रिक डेटा मिळवण्यात शास्त्रज्ञ व्यस्त, नियंत्रण कक्षाचा बोलण्यास नकार, माहिती मिळाल्यावर करणार घोषणा
  • २.१० - रफ ब्रेकिंग यशस्वीरित्या पूर्ण, काही मिनीटांमध्ये फाईन ब्रेकिंग सुरू होणार
  • २.०३ - इस्रोच्या नियंत्रण कक्षात तणाव आणि उत्सुकतेचे वातावरण, शास्त्रज्ञ सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून
  • २.०० - सर्व काही सुरळीत असल्याचे इस्रोकडून प्रतिपादन
  • १.५६ - चंद्राच्या पृष्ठभागापासून विक्रम लँडर अवघ्या १८ किलोमीटरवर. काही मिनिटांमध्ये विक्रमचा कॅमेरा लँडिगसाठी चंद्रावर जागा शोधणार.
  • १. ४९ - विक्रम लँडर 18 किलोमीटर चंद्रापासून दूर
  • १.४० - विक्रम लँडर चंद्रावर उतरण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे विक्रम लँडरचा वेग कमी करण्यात येत आहे. २३० मीटर प्रति सेकंदावर वेग कमी केला आहे.
  • १.३० - ऐतिहासिक क्षणासाठी सर्वजण सज्ज, काही मिनिटांमध्ये होणार सॉफ्ट लँडिंग
  • 1.26 - पंतप्रधान मोदी बंगळुरुमधील इस्रोच्या नियंत्रण कक्षात दाखल, इस्रो प्रमुखांनी केले स्वागत
  • 11.30 PM - 130 कोटी भारतीयांची उत्कंठा शिगेला, देशभरात प्रार्थना
  • 11.05pm - देशभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांवर शुभेच्छांचा वर्षाव.
  • 10.45 pm - चांद्रयान २ मिशन यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार.
  • 10:30 PM - पंतप्रधान मोदी हे एक वाजेपर्यंत इस्रोच्या मुख्यालयात पोहोचणार.
  • 10:25 PM - चांद्रयानाच्या लँडिंगसाठी इस्रोची तयारी पूर्ण असल्याचे, इस्रोने "We Are Ready" असे ट्विट करत सांगितले आहे.
  • 9:50PM - पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरु विमानतळावर पोहोचले.

देशासह जगभरातील शास्त्रज्ञ आणि भारतातील सर्व लोक या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि या सर्वांसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील, चांद्रयान-२ च्या लँडिंगसाठी उत्सुक आहेत. चांद्रयान-२ च्या वाटचालीची, तिथल्या घडामोडींची ते क्षणाक्षणाला माहिती घेत आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 7, 2019, 12:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.