श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात मंगळावारी केंद्रीय राखीव दलाच्या गस्त पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे.
अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरातील केंद्रीय राखीव दलाच्या पथकावर आमच्या सैनिकांनी हल्ला केला आहे, असा दावा इस्लामिक दहशतवादी संघटनने आपल्या अमाक या वृतसंस्थेद्वारे केला आहे.
जवानांचे एक पथक गस्तीवर असताना अचानक दहशतवाद्यांनी गोळीबारासह ग्रेनेड हल्लाही केला. या हल्ल्यात सीआरपीएफ दलाचा एक जवान शहीद झाला आहे. अनंतनाग जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सुदीप चौधरी यांनी हल्ल्याची माहिती दिली. काश्मीर खोऱ्यात पोलीस आणि लष्कर मिळून दहशतवाद्यांविरोधात संयुक्त अभियान राबवत आहे. सोमवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाले , तर 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.