ETV Bharat / bharat

गंगेच्या स्वच्छतेसाठी धर्मश्रद्धा पुरेशी? - गंगा नदी स्वच्छता

गंगा नदी वाचविण्यासाठी आधीच कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला आहे. परंतु आजही अलाहाबादमध्ये जे काही थोडे फार नदीचे पाणी शिल्लक आहे, ते पिण्यायोग्य नाही. गेल्यावर्षी (2019) झालेल्या अर्धकुंभमेळ्यानंतर संपुर्ण शहराला रोगकारक जंतू आणि नदी किनाऱ्यावर सडलेला कचऱ्याने व्यापून टाकले होते. लाखो भक्तांच्या श्रद्धेबाबत कसलीही शंका नाही, परंतु ही श्रद्धा निर्मळ श्रद्धा आहे का?

Is faith enough to clean the sacred Ganga?
गंगेच्या स्वच्छतेसाठी धर्मश्रद्धा पुरेशी?
author img

By

Published : Feb 27, 2020, 4:32 PM IST

"जल हे आईप्रमाणेच आपला सांभाळ करते" - तैत्तिरिय संहिता

अनास्थेप्रमाणेच पर्यावरणीय हिंसादेखील संसर्गजन्य असते, जे आता भारतीय संस्कृतीत नित्याचेच झाले आहे. एखाद्या ऊर्ध्वपातित अफू-हेरॉईनप्रमाणे ही हिंसा अनास्था नावाच्या सुईद्वारे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करीत आहे. आणि हो, आपल्याला हे आवडत आहे. हिंसा आणि अनास्था ही जोडगोळी देशाला ग्रह नाशाच्या मार्गावर नेऊन ठेवण्यास पुरेशी सक्षम आहे. या तंद्रीत आपण पर्वत आणि पाणलोट क्षेत्रांवर कुऱ्हाड घातली असून भारत देशातील पर्यावरणात अखेर कोलाहल माजला आहे. यासाठी मोजावी लागलेली किंमत म्हणजे, जल प्रदुषणामुळे सात लाख लोकांचा अकाली मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांना आमांशापासून ते अवजड धातूच्या विषबाधा अशा लक्षणांचा त्रास सहन करावा लागत आहे. भुपृष्ठावरील पाण्याचे साठे लोप पावत आहेत, तर भूजलाची पातळी दिवसेंदिवस नवी खोली गाठत पुढील दशकात होणाऱ्या जलयुद्धाचे भाकीत करत आहेत.

तरुण भारतीय ‘कंत्राटदार’ मोठ्या गर्विष्ठपणे आपल्या नद्या, तिच्या वाळू बंधाऱ्यांची लूट आणि विध्वंस करीत आहेत, बेकायदेशीरपणे वाळूची चोरी करत आहेत आणि तलशीला खणत आहेत. दुसरीकडे, शहाणी वयस्कर पिढी कर्तव्याचा उपदेश देत आहेत, परंतु ते हे विसरत आहेत की त्यांनीच आपल्यात ही अनास्था निर्माण केली आहे. प्रदुषणासाठी सरकार जबाबदार नाही. त्यासाठी लोकांची पापं- हाव, निष्ठुरता आणि भारतीय आत्म्याचे कुजलेपण कारणीभूत आहे. आपल्या समाजाने हिंसा आणि अनास्थेला जवळ करुन आपल्या गंगा मातेचा बळी दिला आहे.

जागृत देवीप्रमाणे पूज्यनीय असलेल्या ही नदी आता केवळ सुपीक गाळ आणि खनिजांचा भार वाहत नाही, तर तिच्यात कचऱ्याचे विषारी मिश्रण, अब्जावधी लिटरची विष्ठा आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी प्रवेश करीत आहे, तसेच अवजड धातू, औषध प्रतिरोधक रोगकारके आणि मृत्यूही शिरकाव करीत आहे. गंगा ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक प्रदुषित नदी आहे. या नदीचे पाणी केवळ मनुष्यासाठीच नाही तर मासे आणि वनस्पतींसाठीदेखील धोकादायक आहे. यासंदर्भात एनवायटी संस्थेपासून सरकारने स्वतः मूल्यमापन केलेले अहवाल अस्तित्वात आहेत. या अहवालांमध्ये गंगा माता ही वळणे घेत जाणाऱ्या दुर्गंधी सांडपाण्यापेक्षा फार वेगळे नाही, असे आढळून आले आहे.

या समस्येवर उपाय काढण्यासाठी गंगा यात्रा आणि जागरुकता अभियान ही पहिली पायरी असू शकते. परंतु प्रत्यक्ष उपायांपासून या गोष्टी फार लांब आहेत. गंगा नदी वाचविण्यासाठी आधीच कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला आहे. परंतु आजही अलाहाबादमध्ये जे काही थोडे फार नदीचे पाणी शिल्लक आहे, ते पिण्यायोग्य नाही.

यावरुन मला गेल्यावर्षी (2019) झालेल्या अर्धकुंभमेळ्यानंतरची परिस्थिती आठवली. हिंदु धर्मातील सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक असलेल्या या समारंभानंतर संपुर्ण शहराला रोगकारक जंतू आणि नदी किनाऱ्यावर सडलेला कचऱ्याने व्यापून टाकले होते. लाखो भक्तांच्या श्रद्धेबाबत कसलीही शंका नाही, परंतु ही श्रद्धा निर्मळ श्रद्धा आहे का?

उत्तर अवघड आहे, मात्र सत्य उघड आहे. भरकटलेली श्रद्धा किंवा खरंतर तोंडदेखल्या श्रद्धेमुळे काही दशकांच्या कालावधीतच जगातील सर्वात मोठ्या नदीचा बळी गेला आहे. पापी मनासाठी गंगास्नान हा सर्वात स्वस्त उपाय आहे. नदीचा विचार न करता केवळ स्वतःचा विचार करणे म्हणजे हिंदु धर्म नाही तर हिंदु धर्माचा अहंकारी-विकृत विपर्यास आहे.

उपाय अवघड असून यामध्ये त्याग सामावलेला आहे. मनात श्रद्धा ठेऊन सर्वप्रथम आपण नदीतील पवित्र डुबक्यांचे नियमन करणे गरजेचे आहे. विशेषतः उत्तराखंडमधील वरच्या भागात हे गरजेचे आहे. प्रदुषणातील 8- टक्के भाग मलकचऱ्याचा असून ते तातडीने थांबवणे गरजेचे आहे. गंगा संवर्धनासाठी राष्ट्रीय योजनेत, विशेषतः नदीच्या वरच्या भागात, सांडपाणी व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. सध्या आम्ही गंगेवरील राफ्टिंग शिबिरांमधून येणारा कचरादेखील रोखू शकत नाही. आपल्याला मूळ उगमस्थान पवित्र करणे गरजेचे आहे, कार्यक्षम मलनिस्सारण व्यवस्थापन यंत्रणेशिवाय, नदी कधीही तंदरुस्त होऊ शकणार नाही.

उपनद्यांसह संपुर्ण नदीतील पाण्याचे आरोग्य दर्शविणारे सक्रिय पोर्टल असणे आवश्यक आहे. पुढची पायरी म्हणजे गंगेचे पाणलोट क्षेत्र पुर्वपदावर आणणे. याचाच अर्थ असा की, गंगेच्या सर्व उपनद्या राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करणे. या भागात वाळू उपसा, खडक खाणकाम किंवा कचरा टाकणे हा गंभीर गुन्हा घोषित करुन हे करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेचा प्रस्ताव असावा. राज्यांमधील ग्रामीण पोलिसांमध्ये याप्रकरणी संवेदनशीलता निर्माण करणे आवश्यक आहे, कारण नजीकच्या भविष्यात पाणी सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान असू शकते.

सर्वाधिक प्रदुषण करणाऱ्यांवर कडक नियम आणि नवा स्वच्छ गंगा कर आकारणे गरजेचे आहे. कठोर नियमनाचा भाग म्हणून सरकारने नॉर्वे किंवा स्वीडन आणि त्यांचे नदी धोरण लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रदूषण निर्माण करणार्‍या उद्योगांच्या कारखान्यांमध्ये प्रक्रिया प्रकल्प असणे आवश्यक आहे आणि व्यवहारात पारदर्शकता राखण्यासाठी पाण्यासंबंधी राज्य प्रदुषण मंडळाचे अहवाल तिसऱ्या पक्षाकडून तपासून घेणे गरजेचे आहे. पुनरुज्जीवनासाठी गंगा खोऱ्यात अधिक प्रदुषण निर्माण करणाऱ्या शहरांमधून सीएसआर निधीचे पुनर्वाटप करणे गरजेचे आहे. पर्यावरणास अनुकूल व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे गरजेचे असून पर्यावरणीय सेवांना महत्त्व देऊन त्यातून उत्पन्नाचे मार्ग शोधायला हवेत. नदीशेजारी जमिनीचा लहान क्षेत्रे विकसित करावीत. ही क्षेत्रे औद्योगिक नसून हरित उद्योग क्षेत्रे असतील, जी विशेषतः जल शुद्धीकरणाच्या प्रकल्पांसाठी राखीव असतील.

गंगेभोवती असणाऱ्या सामाजिक संस्था आणि शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे. आणि त्यांच्या शेतीचे रुपांतर सेंद्रीय शेतीमध्ये करण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे. ग्राहकांसाठी 'गंगा सेंद्रीय' असा ब्रँडही तयार केला जाऊ शकतो. बिहार सरकारने अशा प्रकारचा प्रकल्प हाती घेतला आहे, ज्याचे नाव आहे 'जैविक सेतू'. गंगेच्या खोऱ्यात सर्वत्र या प्रकल्पाचे अनुकरण करणे आवश्यक आहे.

अखेर, गंगा किंवा यमुना अथवा कोणत्याही नदीवर आलेले संकट हे आपल्या श्रद्धेवरील संकट आहे. आम्ही एक समाज म्हणून आमची संस्कृती नष्ट केली आहे आणि आता रोगराई आणि प्रदूषणाची फळे भोगत आहोत. मृतवत नदी केवळ मृत श्रद्धा आणि मृत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करते. आपली हाव आणि आपला धर्म एकत्र टिकू शकत नाही. एकतर सर्व पावित्र्य सामावलेली नदी जिवंत राहू शकते किंवा हाव आणि पर्यावरणीय ऱ्हासाचा विजय होऊ शकतो. गंगा स्वच्छ करण्यासाठी पैसा आणि सरकार पुरे पडणार नाही, आपल्या नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केवळ त्याग आणि श्रद्धा आवश्यक आहे. कर्तव्याची भावना पुन्हा जागृत करण्यासाठी आपल्याला गंगा सत्याग्रहाची आवश्यकता आहे.

आपल्या जीवनदायिनी नद्या आता विष ओकत आहेत, आणि याला आपणच जबाबदार आहोत. आपण भारतीय नागरिक आणि नदी संस्कृतीच्या पुत्रांनी आपली माता - भारतीय नद्यांसाठी आपला विवेक आणि मातेविषयीचे प्रेम पुन्हा जागृत करण्याची वेळ आली आहे. यावरुन गरुड पुराणातील काही ओळींची आठवण होते -"माणसाची हजारो पापं गंगेच्या सहवासात नष्ट होतात आणि गंगेच्या पाण्याचा केवळ स्पर्श होऊन, ते पाणी प्राशन करुन किंवा केवळ गंगा या नावाच्या उच्चारणाने तो मनुष्य पवित्र होतो". अशी गंगेच्या पावित्र्याची महती होती. आता स्वतःमधील दोष तसेच समाजातील हाव, स्वार्थ आणि पर्यावरणीय हिंसेची स्वच्छता करण्याची आणि श्रद्धेने गंगा मातेला पुन्हा पवित्र करण्याची वेळ आली आहे.

- इंद्र शेखर सिंह, (संचालक, पॉलिसी अँड आऊटरीच, नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.