ETV Bharat / bharat

आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी चिदंबरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, तिहार तुरुंगात रवानगी

author img

By

Published : Sep 5, 2019, 6:26 PM IST

चिदंबरम हे १५ दिवस सीबीआयच्या ताब्यात होते. १५ दिवसांची चौकशी झाल्यानंतर सीबीआयने चिदंबरम यांना विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयात सीबीआयच्या तुषार मेहता यांनी म्हटले, की चिदंबरम यांना जामीन दिल्यास, ते आपले राजकीय वजन वापरून पुराव्यांमध्ये बदल करू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन दिला नाही पाहिजे. यावेळी न्यायमूर्ती आर. भानुमती आणि न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने, ही बाब लक्षात घेत, चिदंबरम यांचा जामीन रद्द केला.

आयएनएक्स मीडिया प्रकरण

नवी दिल्ली - रोज अव्हेन्यू कोर्टाने पी चिदंबरम यांना, आयएनएक्स प्रकरणी १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याआधी, सर्वोच्च न्यायालयाने आज चिदंबरम यांची आयएनएक्स प्रकरणातील जामिनाची मागणी फेटाळली होती.

चिदंबरम हे १५ दिवस सीबीआयच्या ताब्यात होते. १५ दिवसांची चौकशी झाल्यानंतर सीबीआयने चिदंबरम यांना विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयात सीबीआयच्या तुषार मेहता यांनी म्हटले, की चिदंबरम यांना जामीन दिल्यास, ते आपले राजकीय वजन वापरून पुराव्यांमध्ये बदल करु शकतात. त्यामुळे त्यांना जामीन दिला नाही पाहिजे. यावेळी न्यायमूर्ती आर. भानुमती आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या बेंचने, ही बाब लक्षात घेत, चिदंबरम यांचा जामीन रद्द केला.

आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरीत्या अटक केली होती. सीबीआयबरोबरच ईडीदेखील या प्रकरणाची चौकशी करीत आहे. त्यामुळे सीबीआयनंतर आता ईडीदेखील चौकशीसाठी चिदंबरम यांच्यावर अटकेची कारवाई करू शकते.

दरम्यान, आज सकाळी एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात विशेष न्यायालयाने चिदंबरम आणि त्यांच्या मुलाला आंतरिम जामीन दिला आहे. मात्र, आयएनएक्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.