ETV Bharat / bharat

पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी करणारा बीएसएफच्या गोळीबारात ठार - India pak border

पंजाबमधील भारत -पाकिस्तान सीमेवर भींडी सैदा गावाजवळ बीएसएफच्या टेहाळणी पथकाला संशयास्पद हालचाल दिसली होती.

pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 26, 2020, 9:16 PM IST

अमृतसर - पाकिस्तानमधून पंजाबमार्गे भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला बीएसएफ जवानांनी गोळ्या घालून ठार केले. वारंवार इशारा देऊनही ऐकत नसल्याने बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला.

पंजाबमधील भारत -पाकिस्तान सीमेवर भींडी सैदा गावाजवळ बीएसएफच्या टेहाळणी पथकाला संशयास्पद हालचाल दिसली. एक व्यक्ती पाकिस्तान सीमकडून भारतात प्रवेश करत असल्याचे जवानांना दिसले. त्याला वारंवार थांबण्याचा इशारा देण्यात आला. मात्र, त्याने ऐकले नाही, त्यामुळे जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्याच्याकडून कुठलाही शस्त्र साठा किंवा संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आली नाही. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.