लखनौ - हैदराबाद पोलिसांनी पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या ४ आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार केले. तसाच न्याय माझ्या मुलीलाही मिळावा अशी मागणी उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांनी केली. ईटीव्ही भारतच्या प्रतिनीधीने उन्नाव बलात्कार पीडितेच्या नातेवाईकांशी घरी जाऊन चर्चा केली. त्यावेळी पीडितेच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा - उन्नाव बलात्कार: 'गुन्हेगारांना वेळीच शिक्षा केली असती तर, ही वेळ आली नसती'
रायबरेली न्यायालयात जात असताना उन्नाव बलात्कार पीडितेला आरोपींनी रॉकेल टाकून पेटवून दिले. यामध्ये पीडिता ९० टक्के भाजली आहे. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयामध्ये पीडितेवर उपचार सुरू आहेत. सध्या पीडिता मृत्यूशी झुंज देत आहे. हैदराबाद आरोपी एन्काऊंटर प्रमाणे माझ्या मुलीच्या अत्याचारास जबाबदार असलेल्या आरोपींना तशीच शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी सरकारकडे केली आहे.
हेही वाचा - उन्नाव पीडितेची प्रकृती गंभीर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, एका आरोपीने तुरुंगातून बाहेर आल्यावर माझ्या मुलीला मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांनी गुरुवारी हे कृत्य केले. त्यामुळे माझ्या मुलीला हैदराबादप्रमाणे न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली.