ETV Bharat / bharat

...तर आंतरराष्ट्रीय वाहतुकीचाही विचार; नागरी हवाई वाहतूकमंत्र्यांची माहिती.. - प्रवासी विमान वाहतूक

देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक ही २५ मेपासून सुरू करणार असल्याची घोषणा हवाई उड्डाण मंत्रालयाने यापूर्वी केली होती. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती.

International travel may resume step by step says Civil Aviation Minister Hardeep Singh Puri
देशांतर्गत प्रवासी वाहतूकीनंतर टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय वाहतूकीचाही विचार करणार; नागरी उड्डाण मंत्र्यांची माहिती..
author img

By

Published : May 21, 2020, 4:23 PM IST

Updated : May 21, 2020, 5:15 PM IST

नवी दिल्ली - देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक २५ मेपासून सुरू करणार असल्याची घोषणा नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने यापूर्वी केली होती. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीचा कसा परिणाम होतो आहे, हे पाहून पुढे टप्प्याटप्प्याने आम्ही आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्याबाबत विचार करू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

  • Based on our experience on opening up of domestic flights, we might have to tweak some procedures, only then we will think about international flights: Civil Aviation Minister Hardeep Singh Puri pic.twitter.com/Z2gdpReeZp

    — ANI (@ANI) May 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच त्यांनी सांगितले, की २५ मेपासून सुरू होणाऱ्या विमानांपैकी एक तृतीयांश विमाने ही महानगरांमधून लहान शहरांमध्ये प्रवास करतील. या विमानांचे तिकिटीभाडे ठरवण्यासाठी आम्ही विमान मार्गांचे सात भागांमध्ये वर्गीकरण केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

भागप्रवास वेळ
४० मिनिटांहून कमी
४० ते ६० मिनिटे
६० ते ९० मिनिटे
९० ते १२० मिनिटे
१२० ते १५० मिनिटे
१५० ते १८० मिनिटे
१८० ते २१० मिनिटे

यासोबतच, आम्ही कमीत कमी आणि जास्तीत जास्त तिकिट दर निश्चित केला आहे. दिल्ली, मुंबई याठिकाणच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ९० ते १२० मिनिटांच्या प्रवासासाठी कमीत कमी प्रवासभाडे हे ३,५०० रुपये तर जास्तीत जास्त १० हजार रुपये असेल. हे दर २४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.

विमानाच्या प्रवासी क्षमतेच्या ४० टक्के तिकिटे ही तिकिटदराच्या बँडच्या मध्यबिंदूपेक्षा कमी दरात विकावी लागणार आहेत. म्हणजेच, ३,५०० ते १०,००० रुपये असा तिकिटदराचा बँड असेल, तर त्याचा मध्यबिंदू ६,७०० रुपये असेल. त्यामुळे विमान कंपनीला ४० टक्के तिकिटे ही ६,७०० रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये विकावी लागणार आहेत, असेही नागरी उड्डाण मंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : पुलवामात दहशतवादी हल्ला; एकाचा मृत्यू तर, दोन जवान जखमी

Last Updated : May 21, 2020, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.