ETV Bharat / bharat

वांशिक नरसंहार म्हणजे काय? जगातील वंशहत्येच्या मोठ्या घटना - जगभरातील वांशिक हत्येच्या मोठ्या घटना

वांशिक नरसंहारात जगभरात आत्तापर्यंत जगभरात लाखो नागरिकांचे जीव गेले आहेत. अजूनही वांशिक भेदाच्या आणि हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. मग ते मान्यमारमधील रोहिंग्या मुस्लिम असो किंवा सोमालियातील हल्ला. वांशिक हल्ले रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९४८ साली नहसंहार (वांशिक हत्या) परिषद घेतली.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 13, 2020, 10:32 PM IST

हैदराबाद - वांशिक नरसंहारात जगभरात आत्तापर्यंत जगभरात लाखो नागरिकांचे जीव गेले आहेत. अजूनही वांशिक भेदाच्या आणि हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. मग ते मान्यमारमधील रोहिंग्या मुस्लिम असो किंवा सोमालियातील हल्ला. वांशिक हल्ले रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९४८ साली नहसंहार (वांशिक हत्या) परिषद घेतली. या घटनेला आता ७२ वर्ष झाली. वंशहत्येसारखे अमानवी आणि क्रूर गुन्हे रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत या विषयावर सखोल चर्चा झाली. मानवी हक्कांसाठी पहिल्यांदाच एखादा करार स्वीकारण्यात येत होता.

या परिषदेत वंशहत्येसारख्या घटना 'पुन्हा नाही' असे सर्व सदस्य देशांनी ठरवले. तसेच नरसंहार या शब्दाची व्याख्याही ठरविण्यात आली. नरसंहाराची ही व्याख्या आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाते. सदस्य देशांनी नरसंहाराच्या घटना रोखून योग्य ती कारवाई करणे, तसेच गुन्हेगारांना शिक्षा देणे बंधणकारक करण्यात आले आहे.

नरसंहार म्हणजे काय ?

वांशिक हत्या परिषदेच्या कलम २ नुसार नरसंहार म्हणजे, एखाद्या वांशिक, धार्मिक किंवा किवा देशातल्या ठराविक भागात राहणारे नागरिक किंवा संपूर्ण देशाला नष्ट करण्याच्या हेतूनं केलला हल्ला होय.

एखाद्या गटाच्या व्यक्तींची हत्या करणे.

एखाद्या धर्माच्या किंवा ठराविक गटाच्या व्यक्तीवर शारीरिक किंवा मानसिक हल्ला करणे.

एखाद्या धर्माच्या किंवा समुहाच्या नागरिकांना मुले जन्माला घालण्यावर बंधणे आणणे.

बळजबरीने एका धर्माच्या किंवा गटाच्या नागरिकांचे दुसऱ्या धर्मात हस्तांतर करणे.

वांशिक हत्येच्या मोठ्या घटना

  • १९१५ ते १९१८ - पहिल्या महायुद्धात यंग तूर्क राजकीय चळवळीच्या कार्यकर्त्यांनी ऑटोमन साम्राज्यातून अर्मेनियन नागिराकंना संपविण्यासाठी हल्ला केला. यात सुमारे १५ कोटी अर्मेनियम नागरिकांचा मृत्यू झाला. १९२३ पर्यंत मायनर आशिया भागातून अर्मेनिया लोकसंख्या पूर्णत: नाहीशी झाली.
  • १९३२ - १९३३ - तत्कालीन सोव्हियत संघाने देशातील जमीन सार्वजनिक करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यांअंतर्गत नागरिकांच्या खासगी जमिनी सरकार ताब्यात घेत होते. त्यास युक्रेनच्या नागिराकंनी विरोध केला होता. त्यामुळे हुकुमशाहा जोसेफ स्टॅलिन याने युक्रेनमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाणीवपूर्वक तयार केली. यात सुमारे २५ ते ३३ हजार नागरिकांचा मृत्यू झाला.
  • डिसेंबर १९३७ - जानेवारी १९३८ - जपानच्या इंपिरियल सैन्याने चीनच्या नानकिंग प्रांतावर हल्ला केला. यात सुमारे ३ लाख चिनी नागरिक आणि सैन्यांचा मृत्यू झाला. महिला आणि मुलींवर बलात्कार करण्यात येऊन त्यांना गुलाम बनवण्यात आले.
  • नाझी जर्मनीचा नरसंहार

हिटलरने युरोपात १९३८ ते १९४५ या काळात ज्यू वंशाच्या नागरिकांचे शिरकाण केले. नॉर्डीक वंश हा सर्वश्रेष्ठ असून ज्यूंना जगण्याचा अधिकार नाही, अशी त्याची धारणा होती. हजारो ज्यू नागरिकांना त्याने छळ करून मारले. त्यासाठी त्याने छावण्या तयार केल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धात जे देश हिटलरने जिंकले तेथे त्याने सर्व ज्यू नागरिकांचे हक्क काढून घेतले. सुमारे ६ कोटी नागरिकांचे हिटलरने शिरकाण केले.

वंशहत्या किंवा नरसंहाराचे एखाद्या प्रदेशावर होणारे परिणाम

ज्या प्रदेशात वंशहत्येची घटना घडते त्या प्रदेशात गरीबी पसरते तसेच सोईसुविधांची वानवा निर्माण होते. गुन्हेगारी, मुलांचे शिक्षण, सामाजिक विकास, राहणीमानाचा स्तर, अकूशल कामगार, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था हे परिणाम वंशहत्या झालेल्या भागात दिसून येतात. तसेच हा समाज नंतरचे अनेक वर्ष धोकादायक, तणावपूर्व वातावरणात राहतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.