ETV Bharat / bharat

'पीएफआय संघटनेला परदेशातून निधी, गुप्तचर यंत्रणांनी दिला सतर्कतेचा इशारा'

'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (पीएफआय) या संघटनेला आंतरराष्ट्रीय स्तरावरून निधी मिळत आहे. त्याआधारे संघटना उत्तर भारतात जाळे वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे.

PFI
पीएफआयचे चार कार्यकर्ते अटक
author img

By

Published : Oct 6, 2020, 8:18 PM IST

नवी दिल्ली - हाथरसप्रकरणी सरकारची प्रतिमा मलिन करून हिंसाचार घडवण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरून षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप योगी सरकारकडून करण्यात आला आहे. त्यातच आता गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी कारवायांसाठी भारतात येणाऱ्या निधीवरून सरकारला सावधानतेचा इशारा दिला आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की, 'दक्षिण भारतात कारवाया केल्यानंतर आता संघटना दिल्ली राजधानी प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आपले हातपाय पसरायचा प्रयत्न करत आहे. संघटनेने याआधीही विविध राज्यात हिंसाचार पसरवला आहे'.

'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (पीएफआय) या संघटनेला आंतरराष्ट्रीय स्तरावरून निधी मिळत आहे. त्याआधारे संघटना उत्तर भारतात जाळे वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. हाथरस प्रकरणानंतर गुप्तचर यंत्रणांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला हा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी नुकतेच पीएफआय संघटनेच्या चार सदस्यांना मथुरा शहरातून अटक केली आहे. चौघेजण हाथरसकडे निघाले असताना त्यांना अटक करण्यात आली.

उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिकुर रेहमान, सिद्दीकी, मसूद अहमद आणि आलम या चौघांना पीएफआयच्या 'कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया' संघटनेशी संबंधीत असल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील मोबाईल फोन, लॅपटॉप आणि काही पुस्तके जप्त करण्यात आली त्यांच्याकडील साहित्यामुळे शांतता आणि स्थिरता धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. दरम्यान, या अटकेचा पीएफआय संघटनेने निषेध केला आहे. कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाच्या (सीएफआय) कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना अटक केल्याची घटना निंदणीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हाथरस प्रकणावरून सरकारची प्रतिमा मलिन करण्याबरोबरच हिंसाचार पसरविण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावरून होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. हे कारस्थान उघडे पाडण्याचे त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. त्यानंतर सुमारे १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात देशद्रोहाचे कलमही लावण्यात आले आहे. सरकार विरोधात खोटे बोलण्यासाठी काही व्यक्तींनी हाथरमधील पीडित कुटुंबीयांना पैसे देऊ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.