इंदौर - मध्यप्रदेशची राजधानी इंदौरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. संभाव्य कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. इंदौरमध्ये शुक्रवारी कोरोनाचे नवीन 135 रुग्ण समोर आले आहेत. इंदौरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची 842 झाली आहे.
दिल्ली आणि वैद्यकीय महाविद्यालय इंदौरच्या तपासणीत आणखी 248 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. इंदौरमध्ये 47 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. इंदौरच्या वैद्यकिय महाविद्यालयाने 356 नमुन्यांमधील 26 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
दिल्लीमधील केंद्रीय प्रयोगशाळेत 1152 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी दुसऱ्या टप्प्यात 642 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले. त्यापैकी 222 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मागील 24 तासात एकुण 248 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय 159 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या 15 कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती गंभीर आहे.