ETV Bharat / bharat

आता रद्द झालेल्या फ्टाइट्सचे मिळणार रिफंड; इंडिगो, एअर एशिया विमान कंपन्यांनी केली सुरुवात - एअर एशिया विमानसेवा बातमी

ज्या प्रवाशांना स्थगित झालेल्या विमानयात्रेच्या तिकिटाचे क्रेडिट शेलच्या जागी सरळ रिफंड हवे असेल तर, तसेही संबंधित प्रवाशांना देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत एअर एशिया ने ईझीमाय ट्रीप डॉट कॉमला ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

इंडिगो विमानसेवा
इंडिगो विमानसेवा
author img

By

Published : May 28, 2020, 9:32 AM IST

Updated : May 28, 2020, 10:01 AM IST

नवी दिल्ली - ईझीमाय ट्रीप डॉट कॉम (EaseMyTrip.com) या ट्रॅव्हल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इंडिगो आणि एअर एशिया या कंपन्यांनी आता देशांतर्गत विमानसेवेसोबतच ग्राहकांना रद्द झालेल्या फ्लाइट्सच्या तिकिटांचे रिफंड देण्यासही सुरुवात केली आहे. त्यांनी ट्रॅव्हल एजंट्च्या खात्यामध्ये विमानाच्या तिकिटांचे रिफंड जमा करणे सुरू केले आहे. ही ट्रॅव्हल एजंट्सच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असून आता ग्राहकांना रिफंड करताना सुविधा होणार आहे.

ईझीमाय ट्रीप डॉट कॉमचे (EaseMyTrip.com.) सीईओ निशांत पिट्टो याबाबात माहिती देताना म्हणाले, आता ज्या प्रवाशांना स्थगित झालेल्या विमानयात्रेच्या तिकिटाचे क्रेडिट शेलच्या जागी सरळ रिफंड हवे असेल ते त्यानुसार त्या प्रवाशांना देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत एअर एशियाने ईझीमाय ट्रीप डॉट कॉमला ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आम्हाला हे पैसे एअर एशियाच्या तिकिटांच्या वॉलेट प्रणालीतून प्राप्त झाले. त्यानंतर आम्ही संबधित ग्राहकांना त्यांच्या खात्यात तिकिटांचा परतावा दिला, असे ते म्हणाले.

या सोबतच आता अन्य विमानसेवा कंपन्यांनीदेखील तिकिटांचे रिफंड देणे सुरू केले आहे. तसेच, इंडिगोने देखील आमच्या एजंसीमध्ये वॉलेट रिफंड करण्यास सुरुवात केली आहे. यात आम्ही नवीन तिकिटांची खरेदी करू शकतो. तर, दुसरीकडे ग्राहकांना त्यांच्या खात्यात तिकिटांचे रिफंडदेखील करू शकतो, असेही पिट्टो यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे २५ मार्चपासून देशातील विमानसेवा बंद करण्यात आली होती. मात्र, दोन महिन्यानंतर, २५ मेपासून देशांतर्गत विमानसेवेला सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून आता दोन विमान कंपन्यांनी ट्रॅव्हल एजंट्सना तिकिट रद्द केल्यास दोन पर्याय दिले आहेत. यामध्ये एकतर ग्राहकाने रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे क्रेडिट शेलमध्ये ठेऊ शकतो किंवा या पैशांचा वापर तो भविष्यात तिकिट बुक करण्याकरिताही करू शकतो, अशी माहित पिट्टो यांनी दिली.

Last Updated : May 28, 2020, 10:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.