नवी दिल्ली - देशामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 78 हजार 512 जणांना कोरोनाची लागण झाली असून 971 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच रविवारी एका दिवसात तब्बल 8 लाख 46 हजार 278 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी ही तब्बल 36 लाख 21 हजार 246 झाली आहे. तर 7 लाख 81 हजार 975 रुग्ण सक्रिय असून 27 लाख 74 हजार 802 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 64 हजार 469 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर शुक्रवारपर्यंत 4 कोटी 23 लाख 7 हजार 914 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
देशभरामध्ये सर्वांत जास्त 24 हजार 399 मृत्यू हे महाराष्ट्र राज्यात झाले आहेत. तर तामिळनाडूमध्ये 7 हजार 231, कर्नाटकात 5 हजार 589, दिल्लीमध्ये 4 हजार 426, उत्तर प्रदेशात 3 हजार 423 आणि पश्चिम बंगालमध्ये 3 हजार 176 जणांचा मृत्यू झाला आहे.