ETV Bharat / bharat

कोरोनाविषयी जनजागृतीसाठी सैनिकांचा पुढाकार, खबरदारी बाळगण्याचे करताहेत आवाहन - राजस्थान ताजा खबर

भरतपूर गावात एका सेवानिवृत्त सैनिकाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्याची जबाबदारी घेतली आहे.  या गावतील बरेच सैनिक लॉक डाऊन मुळे आपल्या कर्तव्यावर जाऊ शकले नाहीत. ते देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत.

indian-soldiers-are-making-people-aware-in-bharatpur
कोरोनाविषयी जनजागृतीसाठी सैनिकांचा पुढाकार, खबरदारी बाळगण्याचे करताहेत आवाहन
author img

By

Published : Apr 16, 2020, 12:15 PM IST

भरतपूर - सैनिक कधीही निवृत्त होत नाहीत, असे म्हणतात. देशाला जेव्हाही गरज भासते तेव्हा सैनिक सर्वात आधी सेवेसाठी हजर होतात. याचेच उदाहरण भरतपूर जिल्ह्यातील पथैना गावात पाहायला मिळाले. या गावात एका सेवानिवृत्त सैनिकाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्याची जबाबदारी घेतली आहे. या गावातील बरेच सैनिक लॉकडाऊनमुळे आपल्या कर्तव्यावर जाऊ शकले नाहीत. ते देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत.

सेवानिवृत्त हवालदार शिशुपाल सिंह यांनी सांगितले की संपूर्ण गावात 22 माजी सैनिक नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पालन करावे यासाठी तैनात आहेत. भुसावर एसडीएम यांच्याकडून परवानगी घेऊन माजी सैनिकांनी आपल्या दलाचे नाव 'गौरव सेनानी कोरोना' असे ठेवले आहे. नागरिकांनी स्वच्छता तसेच सोशल डिस्टंसचे नियम पाळावेत, यासाठी हे सैनिक माहिती देत आहेत.

कोरोनाविषयी जनजागृतीसाठी सैनिकांचा पुढाकार, खबरदारी बाळगण्याचे करताहेत आवाहन
या गावातील 5 सैनिक (पालवेंद्र, हरजीत, रवि, जयप्रकाश, जय सिंह) हे भारतातील जैसलमेर, श्रीनगर, चंडीगढ, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आपल्या सेवेत रुजू आहेत. मात्र, सुट्टीच्या दरम्यान ते गावी आले असता लॉकडाऊनमुळे गावीच अडकले आहेत. अशा परिस्थितीत ते गावातच नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत. आत्तापर्यंत गावात 20 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गावात अधिक सतर्कतेने संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.