ETV Bharat / bharat

भारतीय फार्मा उद्योग चिनी कच्च्या मालावर अवलंबून...आत्मनिर्भरतेकडे कशी होणार वाटचाल? - Indian pharmaceutical companies news

भारत आणि चीनमधील व्यापारात मोठ्या प्रमाणात तूट असून भारताच्या बहिष्कार धोरणाने चीनला काहीही फरक पडणार नाही, असे चीनचे म्हणणे आहे. 2020 या वित्तीय वर्षात भारताने चीनकडून तब्बल 6 हजार 500 कोटी डॉलरची आयत केली. तर चीनला आपण दीड हजार कोटी डॉलरची निर्यात केली.

भारत चीन  व्यापार
भारत चीन व्यापार
author img

By

Published : Jul 3, 2020, 1:39 PM IST

नवी दिल्ली: भारत- चीन सीमा वादानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशातील ही लढाई फक्त सीमेवरच नाही तर आर्थिक आघाडीवरही लढली जात आहे. चीन आपल्या बलाढ्य व्यापाराच्या जोरावरच जगभरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आयातीसाठी दुसऱ्या देशांवर विषेशत: चीनवर जास्त अवलंबून राहू नये म्हणून भारतानेही नुकतेच आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत देशातील निर्मिती क्षेत्राला चालना देण्यात येत आहे. तर आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

वैद्यकीय क्षेत्रास लागणाऱ्या कच्च्या मालासाठी भारत मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. फार्मा उद्योगासाठी म्हणजे गोळ्या-औषधे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ज्याला वैद्यकीय भाषेत (API) अ‌ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रिडियंट असे म्हणतात, तो चीनकडून येतो. या आयात होणाऱ्या या एपीआयवरच भारतीय फार्मा उद्योग चालतो. भारत मोठ्या प्रमाणात गोळ्याऔषधांचा निर्यातदार देखील आहे. मात्र, याची साखळी चीनमधून सुरू होते.

एपीआय आणि अनेक ऑरगॅनिक(सेंद्रिय) रसायने भारत चीनकडून मागवतो. चीनकडून भारताला होणारी एकूण फार्मास्युटिकल क्षेत्रातील आयात 1 हजार कोटी डॉलरच्या घरात आहे. फार्मा उद्योगातील 70 टक्के आयात भारताला चीनकडून होते. त्यावरून आपण समजू शकतो, चीनशिवाय आपली फार्मा इंडस्ट्री किती पंगू आहे.

व्यापारातील बलाढ्य तूट

भारत आणि चीनमधील व्यापारात मोठ्या प्रमाणात तूट असून भारताच्या बहिष्कार धोरणाने चीनला काहीही फरक पडणार नाही, असे चीनचे म्हणणे आहे. 2020 या वित्तीय वर्षात भारताने चीनकडून तब्बल 6 हजार 500 कोटी डॉलरची आयत केली. तर चीनला आपण दीड हजार कोटी डॉलरची निर्यात केली. दोन्ही देशातील व्यापारात सुमारे 5 हजार कोटी रुपयांची व्यापारी तूट यामध्ये आहे. त्यामुळे भविष्यात चीनकडून होणारी आयात कशी कमी करता येईल, यावर भारताने लक्ष केंद्रीत केले आहे.

कोणत्या प्रकारची गोळ्याऔषधे बनविण्यासाठी एपीआय आयात

बाजारामध्ये मिळणारी गोळ्याऔषधे फार्मा कंपन्या विविध ब्रँडनेमने विकतात. त्यातील काही नावे आपली तोंडपाठही असतील, जसे, की क्रोसीन, विक्स, तापासाठीची डोलो गोळी. ही सर्व ब्रँडनेम आहेत. मात्र, या गोळ्यांमध्ये जे एपीआय वापरले जाते ते आयात करण्यात येते.

अँन्टीबायोटिक्स

एनएसएआयडी

एआरव्ही

अँटी एलिप्टीक

बेसिक कॅन्सर उत्पादने

भारत चीनवर का अवलंबून आहे?

एपीआय बनविण्याच्या उद्योगात नफा खुप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय फार्मा इंडस्ट्री हा कच्चा माल बनवण्याच्या भानगडीत पडत नाही. चीनकडून आयात करणेच सोईस्कर वाटते. चीनकडून आयात करण्याचे प्रमुख कारणे म्हणजे, चीनमध्ये कमी खर्चात हे उत्पादन तयार होते. चीनमधील इफ्रास्ट्रक्चर आणि करांमधील सुट या मुळे हा माल स्वस्त मिळतो.

भारतामध्ये जर एपीआय तयार करायला गेलात तर त्याचा उत्पादन खर्चही जास्त आहे. तसेच त्यामुळे शेवटी भारतातून निर्यात होणाऱया अंतिम उत्पादनाची किंमत वाढते. मग आंतरराष्ट्रीय बाजारातील त्याची स्पर्धा करण्याची क्षमताच राहत नाही. चीनमध्ये आयात केलेला एपीआय भारतात तयार झालेल्या एपीआयपेक्षा 30 टक्क्यांनी स्वस्त आहे. सहाजिकच फार्मा उद्योग आयातील पसंती देतात.

सीमावादानंतर चिनी माल अडकला बंदरात

गलवान खोऱ्यात भारत चीनमध्ये धुमश्चक्री झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली. चिनी बहिष्कराची मोहिम जोर धरत आहे. अशा वातावरणात चीनकडून आयात केलेला माल भारतातील मोठ्या बंदरांवर तसाच पडून आहे. या मालाला क्लिअरन्स देण्यात आलेला नाही. यात मोठ्या प्रमाणात फार्मा उद्योगांसाठी लागणारा एपीआय सुद्धा आहे. त्यामुळे फार्मा कंपन्यांची चिंता वाढली आहे. त्यांचे उत्पादन खोळंबून पडले आहे. किंवा साठवणीतला कच्चा माल संपल्यानंतर उत्पादन होऊ शकत नाही. त्यामुळे व्यापार साखळीलाच धोका पोहचले. विशेषता कोरोनाच्या काळात गोळ्या औषधांची अत्यावश्यक गरज आहे. चीनकडून आलेला सर्व माल तपासण्यात येत असल्याचे कारण कस्टम विभागाने दिले आहे. मात्र, यामागे मुख्य कारण भारत चीन वाद हे आहे.

नुकतेच भारताने बंदरातून माल सोडण्यास सुरुवात केली आहे. फार्मा क्षेत्रातील कच्च्या मालासोबत वाहन आणि इलेट्रॉनिक क्षेत्रातील कच्चा मालही बंदरातून बाहेर काढण्यास परवानगी देण्यात येत आहे.

आत्मनिर्भरतेकडे वाटचाल...

भारतात जास्तीत जास्त एपीआय तयार करण्यासाठी आता सरकारने योजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार एपीआय बनविणाऱ्या भारतीय उद्योगांना सुट देण्यात येत आहे. चीनकडून प्रामुख्याने आयात होणारी 53 एपीआयची यादी भारताने बनवली आहे. त्यांचे उत्पादन भारतात करण्यासाठी चालना देण्यात येणार आहे. फार्मा क्षेत्रातील काही धोरणेही मोठ्या प्रमाणातील आयात वाढण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे 'ड्रग पॉलिसी' चा आढावा घेण्यात येत आहे.

जी उत्पादने कमी महत्त्वाची आहेत, ज्यांचे उत्पादन भारतात केले जाऊ शकते. अशी उत्पादने बनविण्यास चालना देण्यात येत आहे. सरकारने एक बैठक घेतली असून अशा उत्पादनांची यादीही तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. विविध व्यापारी आणि उद्योग संघटनांनी स्वयंपूर्ण भारत बनविण्यासाठी धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. भविष्यामध्ये योग्य धोरणाच्या जोरावर आपण नक्कीच आत्मनिर्भर बनून आयात कमी करु शकू.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.