ETV Bharat / bharat

SLINEX-20 : भारत-श्रीलंकेचे नौदल संयुक्त लष्करी कवायतींसाठी सज्ज! - भारत-श्रीलंका स्लिनेक्स

या कवायतीसाठी श्रीलंकेच्या नौदलाकडून सायुरा आणि गजबाहू या युद्धनौका सहभागी होणार आहेत. श्रीलंकेच्या नौदलाच्या तुकडीचे नेतृत्त रेअर अ‌ॅडमिरल बंदारा जयतिलक हे करणार आहेत. तर, भारताकडून स्वदेशी बनावटीच्या कामोर्ता आणि किल्टन या युद्धनौका सहभागी होणार असून, नौदलाच्या तुकडीचे नेतृत्त्व रेअर अ‌ॅडमिरल संजय वात्स्यायन करणार आहेत.

Indian Navy-Sri Lanka Navy Maritime Exercise scheduled
SLINEX-20 : भारत-श्रीलंकाचे नौदल वार्षिक लष्करी कवायतींसाठी सज्ज!
author img

By

Published : Oct 18, 2020, 9:11 PM IST

नवी दिल्ली : भारत-श्रीलंकेच्या नौदलामध्ये आठवी वार्षिक लष्करी कवायत पार पडणार आहे. 'SLINEX-20' नावाने ही कवायत श्रीलंकेतील त्रिनकोमाली येथे १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.

या कवायतीसाठी श्रीलंकेच्या नौदलाकडून सायुरा आणि गजबाहू या युद्धनौका सहभागी होणार आहेत. श्रीलंकेच्या नौदलाच्या तुकडीचे नेतृत्त रेअर अ‌ॅडमिरल बंदारा जयतिलक हे करणार आहेत. तर, भारताकडून स्वदेशी बनावटीच्या कामोर्ता आणि किल्टन या युद्धनौका सहभागी होणार असून, नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व रेअर अ‌ॅडमिरल संजय वात्स्यायन करणार आहेत. युद्धनौकांसोबतच भारतीय नौदलातील अ‌ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (एएलएच), चेतक हेलिकॉप्टर आणि डोर्निअर मॅरिटाईम पेट्रोल एअरक्राफ्टही या सरावात सहभागी असणार आहे. यापूर्वी २०१९साली सप्टेंबरमध्ये विशाखापट्टणम येथे भारत-श्रीलंकेच्या लष्करादरम्यान वार्षिक कवायत पार पडली होती.

दोन्ही देशांच्या नौदलामध्ये सामंजस्य वाढवणे, युद्धाचे विविध प्रकार आत्मसात करणे आणि आंतर-कार्यक्षमता वाढवणे ही या कवायतीची उद्दिष्टे असणार आहेत. यासोबतच, आपल्या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका, आणि सागरी हेलिकॉप्टर तसेच सागरी विमानांचे कसब दाखवण्यासाठी ही कवायत चांगली संधी असणार आहे.

हेही वाचा : देशात होतोय कोरोनाचा सामूहिक प्रसार; अखेर सरकारनेही केले मान्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.