ETV Bharat / bharat

इराणमध्ये आज भारतीय वैद्यकीय पथक पहिले आरोग्यकेंद्र उभारेल, परराष्ट्रमंत्र्यांची माहिती..

इरामध्ये सध्या साधारणपणे १ हजार २०० भारतीय अडकले आहेत. यामध्ये बहुतांश विद्यार्थी आणि भाविकांचा समावेश आहे. आज दुपारपर्यंत कोरोनामुळे इराणमध्ये एकूण १०७ जणांचा बळी गेला आहे.

Indian medical team to reach Iran, hope to set up 1st clinic today: Jaishankar
इराणमध्ये आज भारतीय वैद्यकीय पथक पहिले आरोग्यकेंद्र उभारेल, परराष्ट्रमंत्र्यांची माहिती..
author img

By

Published : Mar 5, 2020, 5:06 PM IST

नवी दिल्ली - भारताचे वैद्यकीय पथक आज इराणमध्ये पोहचेल. तसेच, आजच तिथे पहिले आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रयत्न करेल. देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली. तसेच, कोरोना विषाणूमुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे कामही सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Indian medical team to reach Iran, hope to set up 1st clinic today: Jaishankar
बुधवारपर्यंत जगभरातील कोरोनाच्या रूग्णांची संख्या..

"इराणमध्ये अडकलेले भारतीय आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी माहिती - आमचे वैद्यकीय पथक हे आज इराणमध्ये पोहोचेल. तसेच, क्वूममध्ये आज संध्याकाळपर्यंत पहिले आरोग्यकेंद्र उभारण्यात येईल अशी आशा आहे. त्यानंतर तातडीने तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तसेच, इराणच्या अधिकाऱ्यांसह तेथे अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासंबंधी चर्चा सुरू आहे.", अशा आशयाचे ट्विट जयशंकर यांनी केले.

  • Group of Ministers constantly monitoring progress. Understand the concern of families.
    Keep faith.

    — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इरामध्ये सध्या साधारणपणे १ हजार २०० भारतीय अडकले आहेत. यामध्ये बहुतांश विद्यार्थी आणि भाविकांचा समावेश आहे.

आज दुपारपर्यंत कोरोनामुळे इराणमध्ये एकूण १०७ जणांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, साधारणपणे तीन हजार लोकांना याचा संसर्ग झाला आहे. इराणच्या ३१ प्रांतांपैकी ३० प्रांतांमध्ये हा विषाणू पसरला असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा : गाझियाबादमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण, देशातील एकूण संख्या ३० वर..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.