कुपवाडा (काश्मीर) - राष्ट्रीय रायफल्सच्या अंतर्गत येणाऱ्या किलो फोर्सने उत्तर काश्मीरच्या बंगस खोऱ्यात मोफत पशुवैद्यकीय शिबिराचे आयोजन केले. यामार्फत केंद्रशासित प्रदेशातील 'रिमोट एरिया'मध्ये राहणाऱ्या स्थानिकांना मदत पुरवण्यात आली.
लष्कराच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहयोगाने शेकडो पाळीव प्राण्यांवर उपचार केल्याची माहिती कॅप्टन ओमकार यांनी माध्यमांना दिली. बंगस खोऱ्यातील सणानिमित्त या शिबिराचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. डोंगराळ भाग असल्याने या ठिकाणी पशुवैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अन्य दुर्गम भागात देखील असे उपक्रम राबवणार असल्याचे ते म्हणाले.
केंद्रशासित प्रदेशातील पशुवैद्यकीय विभाग प्रभावीपणे कार्यरत असून त्यांना अद्याप सुरक्षिततेमुळे पुरेसा प्रवेश मिळाला नसल्याचे कॅप्टन यांनी सांगितले. पशूंसाठी हा हंगाम सर्वोत्कृष्ट आहे. आमच्या प्रणालीमध्ये जे काही आहे, ती आम्ही पशुवैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करत असल्याचे कॅप्टन ओमकार म्हणाले. डोंगराळ भाग जास्त असल्याने आतापर्यंत शिबिरात सर्वधिक उपचार खेचरांवर झाल्याचे ते म्हणालेे. सकाळपासून मोठ्या प्रमाणात घोडे, दुभती जनावरं आणि मेंढ्यांवर उपचार झाल्याची माहिती त्यांनी दिली.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..)