लडाख - पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या ध्रुव हेलिकॉप्टरचे एमर्जन्सी लँडीग करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरमधील सर्व कर्मचारी आणि जवान सुरक्षित आहेत. याप्रकरणी सविस्तर वृत्त हाती आले नाही. लष्करातील सुत्रांनी याबाबत माहिती दिली.
चॉपरमध्ये काहीतरी बिघाड असल्याचे पायलटच्या लक्षात आल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून हेलिकॉप्टर खाली उतरवण्यात आले. पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली भागात भारतीय आणि चीन लष्करामध्ये नियंत्रणरेषेवरुन वाद सुरु आहे. 15 जूनला रात्री झालेल्या हाणामारीत 20 भारतीय जवान शहीद झाले, तर अनेकजण जखमी झाले. तेव्हापासून भारतीय लष्कर सीमेवर सतर्क झाले आहे.
सीमारेषेवर संसाधनांची जुळवाजुळव
तणाव निर्माण झाल्यानंतर भारत आणि चीन दोन्ही देशांनी सीमारेषेवर अतिरिक्त सैन्यबळ आणि सामानाची जुळवाजूळव सुरु केली आहे. चीनच्या बाजूने 100 पेक्षा जास्त वाहने उभी असून भारताचेही ट्रक सीमारेषेवर उभे आहेत. शस्त्रात्रे आणि तोफा आणि इतर सामान आणीबाणीच्या परिस्थितीतसाठी सीमेवर तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास भारत तयार असल्याचे लष्कराने म्हटले आहे.