जम्मू काश्मीर - लष्कराने पाकिस्तानी सैनिकांचा घुसखोरीचा डाव उधळला आहे. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये 'बॉर्डर अॅक्शन टीम' (बॅट) च्या ५ ते ७ घुसखोरांचा भारतीय सैनिकांनी खात्मा केला. ही चकमक केरेन सेक्टरमध्ये झाली. ठार झालेल्या सैनिकांचे मृतदेह सीमेजवळच पडलेले असून ते माघारी नेण्याचा प्रस्ताव भारताने पाकिस्तानपुढे ठेवला आहे.
-
Indian Army: Have offered Pakistan Army to take over the dead bodies(of 5-7 Pak BAT army regulars/terrorists). Pakistan Army has been offered to approach with white flag and take over the dead bodies for last rites,they are yet to respond. pic.twitter.com/x1mF7yHSyv
— ANI (@ANI) August 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Indian Army: Have offered Pakistan Army to take over the dead bodies(of 5-7 Pak BAT army regulars/terrorists). Pakistan Army has been offered to approach with white flag and take over the dead bodies for last rites,they are yet to respond. pic.twitter.com/x1mF7yHSyv
— ANI (@ANI) August 4, 2019Indian Army: Have offered Pakistan Army to take over the dead bodies(of 5-7 Pak BAT army regulars/terrorists). Pakistan Army has been offered to approach with white flag and take over the dead bodies for last rites,they are yet to respond. pic.twitter.com/x1mF7yHSyv
— ANI (@ANI) August 4, 2019
'बॉर्डर अॅक्शन टीम' ही पाकिस्तानच्या लष्कराची दहशतवादी कारवाया करणारे पथक आहे. कुपवाडा जिल्ह्याच्या केरेन सेक्टरमध्ये घुसखोरांनी भारतीय सीमाक्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय लष्कराने त्याचा डाव हाणून पाडला. यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चककमकीत ५ ते ७ जणांना ठार मारण्यात आले. पांढरा ध्वज दाखवत सैनिकांचे मृतदेह घेवून जाण्याचा प्रस्ताव पाकिस्तानपुढे भारताने ठेवला आहे. मात्र, अजूनही चकमक सुरुच असल्याने मृतदेह तेथेच पडून आहेत.
शनिवारी सव्वा आठच्या दरम्यान पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जोरदार गोळीबार केला. यामध्ये तोफगोळ्यांचा मारा केला. भारतीय सैन्याने या आगळीकीला जोरदार प्रत्युत्तर दिले. पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये ही चकमक झाली.
-
Use of cluster bombs by Indian Army violating international conventions is condemnable. No weapon can suppress determination of Kashmiris to get their right of self determination. Kashmir runs in blood of every Pakistani. Indigenous freedom struggle of Kashmiris shall succeed,IA.
— DG ISPR (@OfficialDGISPR) August 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Use of cluster bombs by Indian Army violating international conventions is condemnable. No weapon can suppress determination of Kashmiris to get their right of self determination. Kashmir runs in blood of every Pakistani. Indigenous freedom struggle of Kashmiris shall succeed,IA.
— DG ISPR (@OfficialDGISPR) August 3, 2019Use of cluster bombs by Indian Army violating international conventions is condemnable. No weapon can suppress determination of Kashmiris to get their right of self determination. Kashmir runs in blood of every Pakistani. Indigenous freedom struggle of Kashmiris shall succeed,IA.
— DG ISPR (@OfficialDGISPR) August 3, 2019
दरम्यान, भारताने चकमकी दरम्यान 'क्लस्टर बॉम्ब'चा वापर केल्याचा कांगवा पाकिस्तानने केला आहे. तसेच भारत आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तान सैन्याद्वारे दहशतवाद्यांना काश्मीरात पाठवण्याचा प्रयत्न सतत होत आहे. त्यामुळे पाकिस्तान सीमेवर गोळीबार करत आहे. या घुसखोरीला रोखण्यासाठी कारवाई करत असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे.