ETV Bharat / bharat

भारत-अमेरिकेत 'वज्र प्रहार' युद्धाभ्यास उद्यापासून सुरू होणार - वज्रप्रहार

भारत-अमेरिकेच्या लष्करामध्ये 'वज्रप्रहार' युद्धाभ्यास सियाटल राज्यामध्ये होणार आहे. भारतीय लष्कराच्या ४५ जवानांचे विशेष पथक या सरावामध्ये भाग घेणार आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 12, 2019, 11:36 PM IST

न्युयॉर्क - भारत- अमेरिकेच्या लष्करामध्ये १० वा 'वज्रप्रहार' युद्धाभ्यास होणार आहे. सियाटल राज्यातील 'जॉईंट बेस लुईस मॅककॉर्ड' (जेबीएलएम) येथे हा लष्करी सराव होणार आहे. १३ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हा युद्धाभ्यास होणार आहे, याबाबतची माहिती अमेरिकेतील भारतीय दुतावासाने दिली आहे.

  • Indian Embassy in USA: 10th edition of the joint military exercise ‘Vajra Prahar’ between India & US will be held at Joint Base Lewis-McChord (JBLM) in Seattle. A 45-member Special Forces team from the Indian Army will train alongside US Special Forces from 13–28 October, 2019.

    — ANI (@ANI) October 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, ५ जखमी

भारतीय लष्कराच्या ४५ जवानांचे विशेष पथक या सरावामध्ये भाग घेणार आहे. दोन्ही देशांमध्ये हा दहावा युद्धसराव आहे. दोन्ही देशाचे लष्करांना या सरावातून अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. दोन्ही देशांच्या विशेष सैन्याच्या पथकांना अधिक सक्षम करण्यासाठी या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा - जम्मू काश्मीरमध्ये तब्बल ६८ दिवसानंतर मोबाईल सेवा होणार सुरू

नुकतेच भारताने उत्तराखंडमध्ये कझाकिस्तानच्या सैन्याबरोबर संयुक्त सराव केला. डोंगराळ आणि जंगल भागामध्ये सैन्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी या युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भारत चीन सिमेजवळ लवकरच 'हिमविजय' युद्धसराव आयोजित करण्यात येणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या या युद्धसरावामध्ये अमेरिकी तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रांचा वापर करण्यात येणार आहे. डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये लढण्याासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या '१७ मांऊटन स्ट्राईक कार्पस' ची युद्ध लढण्याची क्षमता या सरावाद्वारे सिद्ध होणार आहे.

Intro:Body:

national news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.