ETV Bharat / bharat

नमस्ते ट्रम्प : भारत-अमेरिकेदरम्यान होणार महत्त्वाचे सुरक्षा करार.. - US prez india visit

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्यावाहिल्या भारतीय दौऱ्यामध्ये, वॉशिंग्टन आणि दिल्लीमध्ये २.६ अब्ज डॉलर्सचा करार होण्याची शक्यता आहे. या कराराद्वारे अमेरिका भारताला असे बहु-भूमिका असलेले २४ 'एमएच-६० आर सीहॉक सागरी हेलिकॉप्टर' पुरवणार आहे.

India, US to ink key defence deal during Trump's visit
नमस्ते ट्रम्प : भारत-अमेरिकेदरम्यान होणार महत्त्वाचे सुरक्षा करार..
author img

By

Published : Feb 23, 2020, 5:13 PM IST

नवी दिल्ली - सागरी भागावर राज्य करण्यासाठी भारतीय नौदल आता सज्ज झाले आहे. कारण, भारताकडे आता प्राणघातक असे 'सीहॉक हेलिकॉप्टर' असणार आहेत. हे जगातील सर्वात प्रगत असे समुद्री हेलिकॉप्टर आहेत, जे शत्रूच्या पाणबुड्यांची अवघ्या काही सेकंदातच शिकार करू शकते.

नमस्ते ट्रम्प : भारत-अमेरिकेदरम्यान होणार महत्त्वाचा संरक्षण करार..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्यावाहिल्या भारतीय दौऱ्यामध्ये, वॉशिंग्टन आणि दिल्लीमध्ये २.६ अब्ज डॉलर्सचा करार होण्याची शक्यता आहे. या कराराद्वारे अमेरिका भारताला असे बहु-भूमिका असलेले २४ 'एमएच-६० आर सीहॉक सागरी हेलिकॉप्टर' पुरवणार आहे.

या हेलिकॉप्टर्सचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये असलेल्या एमके-४६ आणि एमके-५४ एअर लॉन्च टॉर्पेडोस. यामुळे अत्यंत कठिण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्येही कोणतीही मोहीम आरामात पार पाडण्याची क्षमता यांमध्ये आहे.

सागरी भागावर वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने बनवण्यात आलेले हे 'एमएच-६० आर सीहॉक', प्रगत अशी शस्त्रे आणि सेन्सर्सने सज्ज आहे.

यासोबतच, वॉशिंग्टनने भारतासाठी एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीच्या विक्रीसही मान्यता दिली आहे. साधारणपणे १.९ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा हा करार असणार आहे. अमेरिकी पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान या करारावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचे हवेतील व्हाईट हाऊस आणि बीस्ट कार, ही आहेत वैशिष्ट्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.