ETV Bharat / bharat

भारताकडून शेजारी देशांना कोरोना लस मोफत, पाकिस्तान रांगेत नाही - शेजारी देशांना भारत लस देणार

भारताने शेजारील देशांनाही लस देण्याचा निर्णय घेतला असून उद्या बांगलादेशातून एक विशेष विमान लस नेण्यासाठी भारतात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

भारताकडून शेजारी देशांना कोरोना लस मोफत
भारताकडून शेजारी देशांना कोरोना लस मोफत
author img

By

Published : Jan 19, 2021, 11:05 AM IST

नवी दिल्ली - कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी अमेरिका, युरोपसह अनेक देशांनी लसीकरण सुरू केले आहे. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना आणीबाणीच्या काळात वापरासाठी परवाना देण्यात आला आहे. भारताने शेजारील देशांनाही मानवतेच्या भावनेतून लस देण्याचा निर्णय घेतला असून उद्या बांगलादेशातून एक विशेष विमान लस नेण्यासाठी भारतात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

शेजारी देशांना भारताची मदत -

भुटान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ या शेजारील देशांना भारत कोरोनाची लस मोफत देणार आहे. मात्र, अद्याप यात पाकिस्तानचा सामवेश झाला नाही. पाकिस्ताननेही भारताकडे अद्याप लसीची मागणी केली नाही, अशी माहिती सरकारमधील सुत्रांनी ईटीव्ही भारतला दिली.

परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची बैठक -

परराष्ट्र मंत्रालय , रसायने आणि खते मंत्रालय, आरोग्य मंत्रालयाची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला भारत बायोटेक आणि सीरम कंपनीचे प्रतिनिधीही हजर होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोव्हॅक्सीन लस मंगोलिया, ओमान, म्यानमार, बराहीन, फिलिपाईन्स, मालदीव आणि मॉरिशस देशात निर्यात करण्यात येणार आहे. तर कोव्हिशिल्ड लस अफगाणिस्तान, भूटान, बांगलादेश, नेपाळ आणि सेशल्स देशांत पाठवण्यात येणार आहे. मात्र, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नाही.

भारताला लसीची किती गरज आहे, याचा आढावा घेऊन लस निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेजारी देशांनाही लसीकरण कार्यक्रम सुरू करता यावा, हा उद्देश ठेवून भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. गरीब देशांना सुरूवातीला मोफत लस देण्यात येईल. मात्र, त्यानंतर लसीसाठी पैसे आकारले जातील, अशी माहिती मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.