ETV Bharat / bharat

दिलासादायक... देशभरात कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचा दर 26.59 टक्के

author img

By

Published : May 4, 2020, 9:33 AM IST

गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 682 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 26.59 टक्के झाल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी सांगितले.

Dr Harsh Vardhan
Dr Harsh Vardhan

नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णाचा दरही वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 682 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 26.59 टक्के झाल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी सांगितले.

आतापर्यंत 10,632 लोक या संसर्गजन्य आजाराने बरे झाले आहेत. नवीन प्रकरणांच्या वाढीचा दरही थोड्या काळासाठी स्थिर झाला आहे. देशात 130 हॉटस्पाट तर 284 नॉन हॉटस्पाट जिल्हे आहेत. तसेच 319 जिल्हे संसर्गमुक्त आहेत. भारताने आतापर्यंत 10 लाख चाचण्या पार केल्या असून सध्या एका दिवसात 74,000 चाचण्या घेण्यात येत असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगतिले.

सरकारने भारतभरात सुमारे 20 लाख पीपीई किट वितरित केल्या आहेत. या बाबतीत भारत इतर देशांपेक्षा चांगल्या स्थितीत असून कोरोना संकटात कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे. भारताच्या कामगिरीचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतूक केले आहे.

आरोग्यमंत्र्यांनी लोकांना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याचे पालन करण्याचे आणि कोरोना संसर्गांची साखळी तोडण्याचे आवाहन केले. आपन यशाच्या वाटेवर असून कोरोनाविरोधातील हे युद्ध जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोन रुग्णावर उपचार करणाऱया डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले करू नये, तसचे कोरोना आजारामधून बऱ्या झालेल्या रुग्णांना अपमानित करु नये, असे आवाहन त्यांनी लोकांना केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.