ETV Bharat / bharat

देशातील कोरोना रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ; गेल्या 24 तासात 20 हजार 903 जणांना संसर्ग

author img

By

Published : Jul 3, 2020, 11:26 AM IST

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाख 25 हजार 544 इतका झाला आहे. सध्या 2 लाख 27 हजार 439 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 3 लाख 79 हजार 892 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 18 हजार 213 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

नवी दिल्ली - देशातील विविध राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 20 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त आढळले असून 379 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने देशात चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाखापेक्षाही अधिक झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाख 25 हजार 544 इतका झाला आहे. सध्या 2 लाख 27 हजार 439 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 3 लाख 79 हजार 892 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 18 हजार 213 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...

महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 8 हजार 178 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 86 हजार 626 वर गेली आहे. यातील एकूण 77 हजार 276 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 1 हजार 172 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. दरम्यान राज्याने गुरुवारपर्यंत 10 लाख कोरोना चाचण्याचा टप्पा पार केला. इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे.

नवी दिल्लीमध्ये 92 हजार 175 कोरोनाबाधित आहेत. तर 2 हजार 864 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गुजरात राज्यात 33 हजार 913 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 886 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 98 हजार 392 कोरोनाबाधित तर 1 हजार 321जणांचा बळी गेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.