नवी दिल्ली - आज जागतिक भूक निर्देशांक म्हणजेच ‘ग्लोबल हंगर इंडेक्स' (जीएचआय) अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून 107 देशांच्या यादीत भारत 94 व्या क्रमांकावर आहे. तर गेल्या वर्षी 2019 मध्ये भारत 117 देशांच्या यादीत 102 क्रमांकावर होता. जागतिक भूक निर्देशांकानुसार इंडोनेशिया, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश हे भारताच्या तुलनेत चांगल्या स्थानी आहेत. इंडोनेशिया 70, नेपाळ 73, बांगलादेश 75 आणि पाकिस्तान 88व्या स्थानावर आहे. अहवालानुसार भारताची 14 टक्के लोकसंख्या कुपोषित आहे.
2014 मध्ये 76 देशाच्या यादीत भारत 55 स्थानावर होता. तर 2017 मध्ये 119 देशाच्या यादीत 100 वा क्रमांक आला होता. तसेच 2018 मध्ये 119 देशाच्या सूचित 103 स्थानावर होता. त्यानंतर 2019 मध्ये 117 देशांच्या यादीत 102 क्रमांकावर होता.
जागतिक भूक निर्देशांक हे देशातील उपासमारीचे मापन करण्याचे बहुमितीय साधन असून याचा अहवाल वर्षातून एकदा प्रसिद्ध केला जातो. याची सुरवात 2006 मध्ये या जर्मन स्वयंसेवी संस्थेने केली होती. यात 2007पासून या आयरिश स्वयंसेवी संस्थेने सहप्रकाशक म्हणून सहभाग घेतला.
निर्देशांक 0 ते 100 या दरम्यान मोजला जातो. शून्य म्हणजे शून्य उपासमार आणि 100 म्हणजे पूर्ण उपासमार होय. तसेच जागतिक भूक निर्देशांकात चार निदर्शक घटक आहेत. यामध्ये एकूण लोकसंख्या कुपोषित असलेल्या व्यक्तींचे प्रमाण, 5 वर्षाखालील बालकांमधील कुपोषित असणाऱ्या बालकांचे प्रमाण, 5 वर्षाखालील खुंटलेली वाढ असणाऱ्या बालाकांचे प्रमाण, तर बाल मृत्यूदरात 5 वर्षाखालील बाल मृत्यूदर, हे चार निदर्शक घटक आहेत.