नवी दिल्ली - २ ऑक्टोबर या दिवसाला भारताच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनाप्रमाणे २ ऑक्टोबरही राष्ट्रीय स्तरावर विशेष दिन मानला जातो. या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसान ही प्रसिद्ध घोषणा देणारे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रींचा जन्म झाला होता. शास्त्रींची आज त्यांची ११५ वी जयंती आहे.
-
#WATCH Prime Minister Narendra Modi arrives to pay tribute to former Prime Minister Lal Bahadur Shastri at Vijay Ghat. Delhi Chief Minister Arvind Kejriwal & Deputy CM Manish Sisodia also present. (earlier visuals) #LalBahadurShastriJayanti pic.twitter.com/3J25RBihcw
— ANI (@ANI) October 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Prime Minister Narendra Modi arrives to pay tribute to former Prime Minister Lal Bahadur Shastri at Vijay Ghat. Delhi Chief Minister Arvind Kejriwal & Deputy CM Manish Sisodia also present. (earlier visuals) #LalBahadurShastriJayanti pic.twitter.com/3J25RBihcw
— ANI (@ANI) October 2, 2019#WATCH Prime Minister Narendra Modi arrives to pay tribute to former Prime Minister Lal Bahadur Shastri at Vijay Ghat. Delhi Chief Minister Arvind Kejriwal & Deputy CM Manish Sisodia also present. (earlier visuals) #LalBahadurShastriJayanti pic.twitter.com/3J25RBihcw
— ANI (@ANI) October 2, 2019
शास्त्रीच्या ११५ व्या जयंती निमित्ताने पंतप्रधान मोदींसह अनेक बड्या नेत्यांनी विजयघाट येथे त्यांना श्रद्धांजली वाहिली. शास्त्रींचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ ला उत्तरप्रदेशातील मुगलसराय येथे झाला. लाल बहादुर शास्त्रींनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या नम्र स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. पंडित जवाहरलाल नेहरुनंतर ते देशाचे दुसरे पंतप्रधान बनले.
तुमच्या जीवनात अनेक गोष्टींचा अभाव असला तरी तुम्हाला यशस्वी आणि सक्षम होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, असा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो. त्यांचे जीवन प्रत्येक तरुणाला संघर्ष करण्याची प्रेरणा देते.
१९६५ च्या युद्धावेळी शास्त्रींनी 'जय जवान जय किसान'चा दिलेला नारा आजही लोकांच्या स्मरनात आहे. तसेच ही घोषणा आजही तितक्याच प्रभावाने लागू होते. १९६५ च्या युद्धात पाकिस्तानवर हल्ला करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. अतिशय नम्र स्वभावाचे शास्त्री तितकेच कणखरही होते. त्यांनी आपले पूर्ण जीवन गोरगरिबांच्या सेवेसाठी अर्पण केले. लाल बहादुर शास्त्रींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठीही महत्त्वाची भूमिका पार पाडली.