नवी दिल्ली - भारताने गोपनीय असलेल्या हेरगिरी आणि शेअरिंग नेटवर असलेल्या फाईव्ह आईजमध्ये ससहभाग घेतला आहे. जपानने बलाढ्य तंत्रज्ञान कंपन्यांकडून इनक्रिप्टेड संवादाची माहिती घेण्यासाठी साधनांची मोहिती मागविली आहे. त्यामध्ये व्हाटसअप, सिग्नल, टेलिग्रॅम, फेसबुक व मेसेंजर आदींचा समावेश आहे.
फाईव्ह आईज ही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अमेरिका या सरकारांनी गोपनीय माहिती आदान-प्रदान करण्यासाठी सुरू केलेला १९४१ ला सुरू केला क्लब आहे. यामध्ये राजनैतिक, सुरक्षा, सैन्य आणि आर्थिक फायद्याची माहिती संबंधित देशांना मिळविता येते.
भारत आणि जपानच्या अज्ञात प्रतिनिधींनी फाईव्ह आईजच्या करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. इन्क्प्रिशन हे गोपनीयतेसाठी महत्त्वाचे साधन आहे. सायबर सुरक्षेचे संरक्षण केले पाहिजे. ते केवळ तंत्रज्ञा कंपन्यापुरते मर्यादित राहू नये, त्याविरोधात, गंभीर, बेकायदेशीर मजकूर आणि अॅक्टिव्हटी असेल त्यावर कारवाई करणे शक्य व्हावे, फाईव्ह आईजच्यावतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सरकारी कंपन्यांना इनक्रिप्टेड डाटा देण्यास तंत्रज्ञान कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. एकट्या व्हॉट्सअपचे भारतात ४०० दशलक्ष तर जगात २.७ वापरकर्ते आहेत.