ETV Bharat / bharat

आसाममध्ये होणार भारत-जपान धोरणात्मक शिखर बैठक - हेमंत बिस्वा

author img

By

Published : Dec 16, 2019, 8:30 PM IST

भारत-जपान दरम्यानची धोरणात्मक शिखर बैठक आसाममध्येच होणार असल्याचे भाजप नेता हेमंत बिस्वा शर्मा यांनी सांगितले.

हेमंत बिस्वा
हेमंत बिस्वा

नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात ईशान्य भारतात आंदोलन सुरु आहेत. सध्या गुवाहटीमधील परिस्थिती सामान्य होत आहे. त्यामुळे भारत-जपान दरम्यानची धोरणात्मक शिखर बैठक आसाममध्येच होणार असल्याचे भाजप नेता हेमंत बिस्वा शर्मा यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात १५ ते १७ डिसेंबर दरम्यान द्विपक्षीय चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी दिली होती. आसाममध्ये आंदोलन सुरू असल्यामुळे बैठक रद्द होणार अश्या चर्चा सुरू होत्या. मात्र बिस्वा यांनी बैठकीची जागा बदलण्यात येणार नसून तारीख बदलण्यात येऊ शकते, असे सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी आणि अ‌ॅबे यांची काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यालाही भेट ठरली आहे. परंतु, आता आसाममध्ये संचारबंदी लागू केली केंद्र सरकारला आपल्या पूर्वयोजनेचा तातडीने फेरविचार करावा लागणार आहे. आतापर्यंत, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भेटीच्या तारखा किंवा स्थळाबद्दल फेरविचार सुरू आहे का, याबाबत वारंवार माध्यमांनी विचारणा केल्यानंतरही मौन पाळले आहे.

नवी दिल्लीतील जपानी दूतावास परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे. यजमानांनी केलेल्या व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, असे एका वरिष्ठ जपानी राजनैतिक अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.

Intro:Body:

आसाममध्ये होणार भारत-जपान धोरणात्मक शिखर बैठक - हेमंत बिस्वा

नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात ईशान्य भारतात आंदोलन सुरु आहेत. सध्या गुवाहटीमधील परिस्थिती सामान्य होत आहे. त्यामुळे भारत-जपान दरम्यानची धोरणात्मक शिखर बैठक १आसाममध्येच होणार असल्याचे भाजप नेता हेमंत बिस्वा शर्मा यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात १५ ते १७ डिसेंबर दरम्यान द्विपक्षीय चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी दिली होती. आसाममध्ये आंदोलन सुरू असल्यामुळे बैठक रद्द होणार अश्या चर्चा सुरू होत्या. मात्र बिस्वा यांनी बैठकीची जागा बदलण्यात येणार नसून तारीख बदलण्यात येऊ शकते, असे सांगितले आहे.

 पंतप्रधान मोदी आणि अ‌ॅबे यांची काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यालाही भेट ठरली आहे. परंतु, आता आसाममध्ये संचारबंदी लागू केली केंद्र सरकारला आपल्या पूर्वयोजनेचा तातडीने फेरविचार करावा लागणार आहे. आतापर्यंत, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भेटीच्या तारखा किंवा स्थळाबद्दल फेरविचार सुरू आहे का, याबाबत वारंवार माध्यमांनी विचारणा केल्यानंतरही मौन पाळले आहे.

नवी दिल्लीतील जपानी दूतावास परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे. यजमानांनी केलेल्या व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, असे एका वरिष्ठ जपानी राजनैतिक अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.