ETV Bharat / bharat

उत्तर अरबी समुद्रात भारत-जपान सागरी युद्धसराव JIMEX-2020 सुरू

समुद्री सुरक्षा सहकार्यावर विशेष लक्ष केंद्रित करून जेआयएमईएक्स सरावाची मालिका जानेवारी २०१२ मध्ये सुरू झाली. यातील याआधीचा सराव 2018 मध्ये विशाखापट्टणम येथे झाला होता. मागील काही वर्षांत भारत आणि जपानचा युद्धसराव मोठ्या प्रमाणावर वाढला असून अधिकाधिक उंच पातळीवर पोहोचला आहे.

भारत-जपान सागरी युद्धसराव JIMEX-2020
भारत-जपान सागरी युद्धसराव JIMEX-2020
author img

By

Published : Sep 27, 2020, 6:12 PM IST

नवी दिल्ली - भारतीय नौदल आणि जपानी सागरी स्वसंरक्षण दलाच्या (जेएमएसडीएफ) जहाजांनी भारत-जपान सागरी द्विपक्षीय 'क्लोज फॉर्मेशन' सरावाच्या चौथ्या आवृत्तीला JIMEX-2020 (जेआयएमईएक्स-2020) सुरुवात केली. हा सराव 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान उत्तर अरबी समुद्रात आयोजित करण्यात आला आहे. भारतीय नौदल आणि जपानी सागरी स्वसंरक्षण दल (जेएमएसडीएफ) यांच्यात द्वैवार्षिक सराव सुरू आहे.

समुद्री सुरक्षा सहकार्यावर विशेष लक्ष केंद्रित करून जेआयएमईएक्स सरावाची मालिका जानेवारी २०१२ मध्ये सुरू झाली. यातील याआधीचा सराव 2018 मध्ये विशाखापट्टणम येथे झाला होता. मागील काही वर्षांत भारत आणि जपानचा युद्धसराव मोठ्या प्रमाणावर वाढला असून अधिकाधिक उंच पातळीवर पोहोचला आहे.

भारत-जपान सागरी युद्धसराव JIMEX-2020

हेही वाचा - अंजूमनच्या 'या' ग्रंथालयात आहे, उर्दूतील सर्वात‍ दुर्मिळ 'वाल्मिकी रामायण'

जीआयएमईएक्स -2020 दरम्यान नियोजित प्रगत कार्यवाही आणि सराव यामुळे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार भारत-जपानी संरक्षण संबंधातील वाढते सातत्य अधिक सुरक्षित, मुक्त आणि सर्वसमावेशक होत चालले आहे. हे दोन्ही सरकारच्या प्रयत्नांचे सूचक आहे. जीआयएमईएक्स -2020 मुळे आंतर-कार्यप्रणाली संयुक्त कार्यवाही कौशल्यांची उच्च पातळी दर्शवेल, तसेच, आंतरराष्ट्रीय सागरी कार्यवाहीही अधिक अद्ययावत पातळीवर पोहोचेल.

या युद्धसरावदरम्यान शस्त्रास्त्र गोळीबार, क्रॉस डेक हेलिकॉप्टर ऑपरेशन्स आणि गुंतागुंतीचा पृष्ठभाग, पाणबुडीभेदी आणि हवाई युद्ध सराव या दोन प्रकारच्या नौदलांनी समन्वयातून विकसित केलेल्या एकत्रित बहुआयामी रणनैतिक सरावावर भर दिला आहे. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांना डोळ्यासमोर ठेऊन जीआयएमईएक्स -2020 दरम्यान 'नॉन-कॉन्टॅक्ट अ‌ॅट-सी-ओन्ली फॉरमॅट'च्या आधारे हा सराव केला जात आहे.

रीअर अ‌ॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग वेस्टर्न फ्लीट यांच्या नेतृत्वाखाली स्वदेशी बनावटीची विनाशिका 'चेन्नई', तेग क्लास स्टेल्थ फ्रीगेट तारकश, फ्लीट टँकर दीपक हे भारतीय नौदलाचे प्रातिनिधित्व करत आहेत.

हेही वाचा - कोरोनाच्या नावे नागरिकांची लूट.. अधिकार नसतानाही क्लिनअप मार्शलकडून दंडवसुली, गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.