ETV Bharat / bharat

'मोदींनी निर्माण केलेल्या संकटामुळे भारत धक्क्यात' - Rahul Gandhi tweet news

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देश सहा समस्यांना सामोरे जात असून या समस्या म्हणजे मोदी सरकारने तयार केलेले संकट असल्याचे गांधींनी म्हटले आहे.

संपादित
संपादित
author img

By

Published : Sep 2, 2020, 12:47 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घसरलेल्या जीडीपीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. रोजगाराचे कमी झालेले प्रमाण, रोज कोरोनाच्या रुग्णांची होणारी सर्वोच्च संख्या आणि सीमेवर बाहेरुन घुसखोरी ही संकटे मोदींनी निर्माण केल्याचा राहुल गांधींनी दावा केला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देश सहा समस्यांना सामोरे जात असून या समस्या म्हणजे मोदी सरकारने तयार केलेले संकट असल्याचे गांधींनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मोदींनी निर्माण केलेल्या संकटात भारत धक्क्यात आहे. देशाच्या जीडीपीत २३.९ टक्क्यांची ऐतिहासिक घसरण झाली आहे. तर बेरोजगारीचे प्रमाण हे गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक आहे. देशात १२ कोटी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. केंद्र सरकार राज्यांना थकित जीएसटी देत नाही. तर जगात सर्वाधिक देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूंची संख्या देशात दिवसेंदिवस वाढत असल्याचेही राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • India is reeling under Modi-made disasters:

    1. Historic GDP reduction -23.9%
    2. Highest Unemployment in 45 yrs
    3. 12 Crs job loss
    4. Centre not paying States their GST dues
    5. Globally highest COVID-19 daily cases and deaths
    6. External aggression at our borders

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) September 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-कर्जफेडीचा कालावधी दोन वर्षांपर्यत वाढविणे शक्य; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था उद्धवस्त

गेल्या काही आठवड्यांपासून राहुल गांधी देशाची अर्थव्यवस्था, कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अमेरिका-चीनमधील तणावाच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर टीका करत आहेत. राहुल गांधींनी ३१ ऑगस्टलाही राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर टीका केली होती. राहुल गांधी म्हणाले होते, की गेल्या सहा वर्षात असंघिटत क्षेत्रावर हल्ला झाला आहे. नोटाबंदीचा उद्देश, चुकीचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि टाळेबंदीने देशातील असंघटित क्षेत्र उद्धवस्त झाल्याची टीका गांधींनी केली होती.

हेही वाचा-ऑगस्टमध्ये ८६ हजार ४४९ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन; गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांची घसरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.