नवी दिल्ली - भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून चीनच्या बाजूने असलेल्या मोलदो येथे बैठक सुरू आहे. यामध्ये सध्या लडाखमधील तणावावर चर्चा सुरू आहे.
भारतीय लष्कराने सध्या नियंत्रण रेषेवरील कार्यवाहीचे नियम (रुल्स ऑफ एंगेजमेंट) बदलले आहेत. त्यामुळे कमांडर परिस्थितीनुरुप सैनिकांना गोळीबार करण्याचा आदेश देऊ शकतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सीमेवरीला परिस्थिती हातळण्यासाठी लष्कराला पूर्णपणे स्वतंत्र्य दिले असल्याचे सांगितले.
नेमके काय घडले?
चीनच्या सैन्याने सोमवारी लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलनजीक (एलएसी) तात्पुरते काही निशाण उभे केले. त्यानंतर आपल्या सैनिकांनी ते सर्व निशाण खाली उतरवले. सुरुवातीला चीनचे सैनिक मागे हटले. मात्र, त्यानंतर ते जवळपास हजार सैनिक घेऊन परत आले. भारताचेही सुमारे हजार सैनिक तिथे होते. त्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसक झटापट झाली. नदीच्या किनारी भागामध्ये ही झटपट झाल्यामुळे कित्येक सैनिक नदीमध्ये पडले. यामध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आले, तर चीनचे देखील ४०पेक्षा जास्त जवान मारले गेल्याचे बोलले जात आहे. या झटापटीनंतर दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला. तसेच या मुद्द्यावरून विरोधकांनी देखील केंद्र सरकारला धारेवर धरले. चीनने भारताच नेमका किती भूभाग बळकावला आहे? याची माहिती देखील केंद्र सरकारकडे मागण्यात आली.