नवी दिल्ली : भारतीय हवाई सेनेचा आज ८८वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेत्यांनी हवाई सेनेला अभिवादन केले.
"हवाई सेना दिनानिमित्त भारतीय हवाई दलामधील सर्व वीर जवानांना शुभेच्छा! तुम्ही केवळ आपल्या देशाच्या हवाई सीमेचे रक्षणच नाही करत, तर आपत्ती काळात देशातील नागरिकांची मदत करण्यासाठीही तुम्ही तत्पर असता. देशाच्या सुरक्षेसाठी तुम्ही आपले प्राण पणाला लावता, ज्यामधून देशातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळते" अशा आशयाचे ट्विट करत पंतप्रधानांनी हवाई सेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
-
एयर फोर्स डे पर भारतीय वायुसेना के सभी वीर योद्धाओं को बहुत-बहुत बधाई। आप न सिर्फ देश के आसमान को सुरक्षित रखते हैं, बल्कि आपदा के समय मानवता की सेवा में भी अग्रणी भूमिका निभाते हैं। मां भारती की रक्षा के लिए आपका साहस, शौर्य और समर्पण हर किसी को प्रेरित करने वाला है।#AFDay2020 pic.twitter.com/0DYlI7zpe6
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">एयर फोर्स डे पर भारतीय वायुसेना के सभी वीर योद्धाओं को बहुत-बहुत बधाई। आप न सिर्फ देश के आसमान को सुरक्षित रखते हैं, बल्कि आपदा के समय मानवता की सेवा में भी अग्रणी भूमिका निभाते हैं। मां भारती की रक्षा के लिए आपका साहस, शौर्य और समर्पण हर किसी को प्रेरित करने वाला है।#AFDay2020 pic.twitter.com/0DYlI7zpe6
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2020एयर फोर्स डे पर भारतीय वायुसेना के सभी वीर योद्धाओं को बहुत-बहुत बधाई। आप न सिर्फ देश के आसमान को सुरक्षित रखते हैं, बल्कि आपदा के समय मानवता की सेवा में भी अग्रणी भूमिका निभाते हैं। मां भारती की रक्षा के लिए आपका साहस, शौर्य और समर्पण हर किसी को प्रेरित करने वाला है।#AFDay2020 pic.twitter.com/0DYlI7zpe6
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2020
तर हवाई दल हे कोणत्याही परिस्थिती आपल्या देशाच्या हवाई सीमेचे रक्षण करण्यास सज्ज असेल असा आपल्याला विश्वास असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हटले आहेत. यासोबत, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांनीही हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत.
हवाई सेना दिनानिमित्त आज गाजियाबादमध्ये भव्य सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत हा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी जवानांचे पथसंचलन, विविध प्रात्यक्षिके आणि विमानांनी हवाई प्रात्यक्षिके असे कार्यक्रम पार पडले.